6-4-24
Patient education program- Diabetes and Diet
Reception
आमच्याबद्दल
आनंद हॉस्पिटलमध्ये आपले स्वागत आहे, आनंद हॉस्पिटल हे आधुनिक आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधांनी सुसज्ज आहे आणि हे आरोग्य सेवा उद्योगातील एक लोकप्रिय नाव आहे. त्यांच्याकडे सर्वोत्कृष्ट डॉक्टर आणि तज्ञांची टीम आहे जी जटिल वैद्यकीय प्रकरणे हाताळू शकतात.
आमचे रुग्णालय रुग्णांना मुख्य आरोग्य सेवांपासून त्यांचे लक्ष न हटवता निदान काळजीमध्ये सर्वोत्तम ऑफर देते.प्राथमिक आरोग्य सेवेचे अंतिम उद्दिष्ट सर्वांसाठी चांगले आरोग्य हे आहे. रुग्णाची कोणतीही समस्या असो, काळजी घेण्यासाठी सहज उपलब्ध मार्ग प्रदान करणे हे उद्दिष्ट आहे.
आमच्या हॉस्पिटलची सर्वोत्तम वैशिष्ट्ये
मधुमेह
मधुमेहाचा बऱ्या न होणाऱ्या जखमा
हृदयविकार
रक्तदाब
दमा
लखवा
फिट्स चे आजार
गरोदरपणा
थायरॉईड
गुंतागुंतीचे गरोदरपण नैसर्गिक किंवा सिझेरियन प्रसूती
सरकारमान्य गर्भपात
मासिकपाळी विशेष तक्रारी
गर्भ पिशवीचे विकार आणि शस्त्रक्रिया
कुटुंब नियोजन सल्ला आणि शस्त्रक्रिया
ESIS मान्यता हॉस्पिटल
पोषणतज्ञ मार्गदर्शन
ऑर्थोपेडिक
PCOD, PCOS
Echocardiogram
X-ray
ECG
Cardiography
Pathology
- छातीचे आजार
- मेंदूचे आजार
- हृदयाचे आजार
- मधुमेह तज्ज्ञ
- जन्मपूर्व तपासणी आणि सामान्य किंवा सिझेरियन प्रसूती
- कुटुंब नियोजन सल्ला आणि शस्त्रक्रिया
- गर्भाशयाचे विकार आणि उपचार
आमचे तज्ञ डॉक्टर
आमच्या ताज्या बातम्या
शिराळा तालुक्यातील ग्रामीण महिला रुग्णांशी डॉ. कृष्णा जाधव यांचा जास्त संपर्क आल्याने मोठ्या प्रमाणात असणारी अंधश्रद्धा त्यांनी जवळून पहिली. २५...
Read More
शिराळा येथे पर्यावरण दिनानिमित्त रोपे वाटप प्रतिनिधी - शिराळा अंबामाता मंदिर शिराळा येथे पर्यावरण दिनानिमित्त महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरदचंद्र...
Read More
शिराळा: नुकतीच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई या आंतरराष्ट्रीय संस्थेची संगीत विशारद (गायन) ही अत्यंत मानाची पदवी मिळाली.सगळीकडून अभिनंदनाचा वर्षाव...
Read More
हम भी कुछ कम नहीं..- डॉ. जाधव ५४ व्या वर्षी झाले संगीत विशारद
Admin
/ February 7, 2024
हम भी कुछ कम नहीं.. डॉ. जाधव ५४ व्या वर्षी झाले संगीत विशारद प्रत्येक माणसाला कोणता ना कोणता छंद असतो....
Read More
ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी यांचे मार्फत अजय इंटरनॅशनल स्कूल रेड येथे...
Read More
डॉ. नितीन जाधव यांना मुंबईतील गंधर्व महाविद्यायाची संगीत विशारद (गायन) पदवी
Admin
/ January 13, 2024
पुणे वैभव शिराळा प्रतापराव शिंदे शिराळा येथील डॉ. नितीन जाधव *एमडी मेडिसिन * यांनी आनंद हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा बजावत जिद्द...
Read More
शिराळा (लक्ष्मीपुत्र) महीलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ. कृष्णा नितीन जाधव यांनी केले. त्या महिला...
Read More
शनिवार दि.६-१-२०२४ हा पत्रकार दिन म्हणून ओळखला जातो. पत्रकार दिनाचे औचित्य साधून संत गाडगे महाराज सभागृह, शिराळा येथे जायंट्स ग्रुप...
Read More
कायदा जनजागरण अभियान दैवी दहशतवादाला आळा घालण्यास कायदा हवाच!-डॉ. दाभोलकर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शिराळा (जि. सांगली) तालुका शाखेच्या वतीने अंधश्रद्धा...
Read More
वैद्यकीय क्षेत्रातील नवदुर्गा ; सामाजीक कार्यकर्त्या डॉ. सौ. कृष्णा जाधव
Admin
/ October 23, 2023
द शिराळा न्यूज, वृत्तसेवा समाज आजची स्त्री हीघडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. विविध क्षेत्रात काम करत असताना अनेकजण समाजासाठी आपणाला काहीतरी...
Read More
मासिक पाळी ही नैसर्गिक, लाज, गैरसमज बाळगू नका - डॉ. जाधव शिराळा / प्रतिनिधी : मासिक पाळी ही नैसर्गिक असल्याने...
Read More
महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी - डॉ. कृष्णा जाधव शिराळा / प्रतिनिधी महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन स्त्री...
Read More
डांगे वैद्यक महाविद्यालयात बेसीक मेथोडोलॉजी वर्कशाप आष्टा / प्रतिनिधी येथील अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालय, पदव्युत्तर संशोधन केंद्र येथे गुरुवार...
Read More
शिराळ्यात हुतात्मा सन्मान मोटारसायकल रॅली > सकाळ वृत्तसेवा शिराळा, ता. ९ : ९ ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त शिराळा पंचायत समिती येथील हुतात्मा...
Read More
डॉ. कृष्णा जाधव हे शिराळा येथे गेली २४ वर्षे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. त्यांनी लहानपणी आपल्या आजीच्या घरी...
Read More
कर्तृत्ववान स्त्रीशक्तिला मानाचा मुजरा मधुरा बाचल यांचे गौरवोद्गार; कोल्हापुरात 'सकाळ वूमन इन्फ्ल्यूएन्सर' पुरस्कार काळ वृत्तसेवा कोल्हापूर, ता. ११ : कौटुंबिक...
Read More
वैद्यकीय व्यवसाय सांभाळून अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संवर्धन : डॉ. नितीन जाधव
Admin
/ April 28, 2022
डोंगरी ओळख तालुका म्हणून असणाऱ्या शिराळा व शाहूवाडी तालुक्यात १९९४ पूर्वी आरोग्यासाठी चांगली सुविधा नव्हती. प्राथमिक उपचार ते ही १५...
Read More
शिराळा, ता. 5: सांगूली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात डॉ. जाधव मियावाकी जंगल निर्मिती प्रकल्पाचा पहिला वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला....
Read More
सकाळ वृत्तसेवा सागाव, ता. २६ : धावपळीमुळे आरोग्यविषयक तक्रारी वाढत आहेत. महिलांनी आरोग्याबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉ....
Read More
डॉ. कृष्णा जाधव : महिलांमध्येही आरोग्य विषयक तक्रारी वाढत्या : आईने मार्गदर्शक होऊन प्रबोधन करावे. आजच्या धावपळीच्या, ताणतणावाच्या युगात पुरुषांच्या...
Read More
आमचे रुग्ण काय म्हणतात
विनायक महादेव गायकवाड
सोमवार दि.११/03/२०२४
पेशेर नाव: श्री महादेव दत्तू गायकवाड रा. शिराळा
अभिप्राय: श्री. विनायक महादेव गायकवाड
सन्मानीय डॉ. नितीन जाधव (सर) हे आमचे फैमली डॉक्टर आहेत. तसेच डॉ· सो कृष्णा जाधव मॅडम हे दाम्पत्य म्हणजे शिराळा तालुक्याच्या वैद्यकीय क्षेत्राला लाभलेले एक वरदान आहे असेच म्हणावे लागेल कारण इथे वेळेत येणारा पेशंट नक्कीच बरा होतो. गेली १२ वर्षापासून मी माझ्या आईवडीलांची ट्रिटमेंट आनंद हॉस्पिटल मध्ये घेत आहे. तेव्हापासून
आज पर्यंत रात्री अपरात्री केव्हाही हे दांम्पत्य उपचारासाठी उपलब्ध असतात. अगदी कोरोना काळात देखील त्यांनी
माझ्या कुटुंबाविषयी दाखवलेले प्रेम आणि दिलेली वैद्यकीय सेवा याचे वर्णन करण्यासाठी शब्दच नाहीत. इतक्या चांगल्या प्रकारे यांनी सर्वांना मदत केली आहे. शेवटी डॉक्टर म्हणजे माणूस आहे १००% सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात नसतात. अपवादात्मक परिस्थिती मध्ये दुर्घटना घडू शकते मात्र त्यास डॉक्टर जबाबदार असतातच असे नाही.
मात्र आजवर मला आलेला अनुभव पाहता डॉक्टर दांम्पत्य आणि इथे काम करणारा स्टाफ पेशंट बरा व्हावा म्हणूनच त्यांचे कर्तव्य पार पाडत असतो. यापुढील काळात आनंद हॉस्पिटल कडून जास्तीत जास्त चांगली रुग्ण सेवा घडो यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना-- भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
कळावे
आपला स्नेहांकीत
विनायक म.. गायकवाड
शिराळा जि. सांगली
बड़ेसो मोहिद्दीनसो पिरजादे
अभिप्राय
-
दि. ४/3/20२४
नमस्कार आदरणीय वैदयजी
मी बड़ेसो मोहिद्दीनसो पिरजादे मु. फाकिरवाडी, पोस्ट इंगुळ, तालुका शिराळा, जिल्हा सांगली पिनकोड ४१५४०८ महाराष्ट्र
दि. १/३/२०२४ रोजी सकाळी लवकर ७.०० वाजता फिट व हृदयरोग झटका, मेंदुतील रक्ताच्या चरबीच्या गाठी अशा एकूण जबरदस्त आजाराने ग्रस्त माझी आई हबाबी मोहिद्दीनसो पिरजादे, हिला घेऊन मी दवाखान्यामध्ये दाखल झालो. त्यानंतर डॉक्टरांनी वेगवेगळ्या चाचण्या करून आधुनिक नवनवीन औषधे व तंत्रज्ञान वापरून माझ्या आईला मोठ्या आजारातून १००% बरे केल्यामुळे मी डॉक्टरांचा शतशः आभारी आहे डॉक्टरांनी उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा देऊन रुग्णांना चांगले करावे. डॉक्टरांच्या भावी वाटचाली बद्दल मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो.
धन्यवाद.
बड़ेसो मोहिदीनसा पिरजादे
सौ. लक्ष्मी सचिन नांगरे
मी लक्ष्मी सचिन नांगरे कोकरूड आपल्या हॉस्पीटलची चर्चा खुप होते. तसेच सर्व स्टाफचे आणि डॉक्टरचे आभार मानतो. मी दि 01/03/2024 रोजी ऍडमिट झालो होतो त्याआधी मी कोकरूड मध्ये डॉक्टरकडे दाखवले होते त्यांनी आम्हाला आनंद हॉस्पिटलाचा पता दिला त्यानंतर आम्ही 01/03/2024 रोजी सकाळी 8.00 ला आनंद हॉस्पीटल
शिराळा येथे आलो त्यावेळी माझी परिस्थीत क्रिटिकल होती. पण आनंद हॉस्पीटल मध्ये आल्यानंतर जाधव मॅडमांनी मला लगेच निदान समजून सांगितले व ताबडतोड ऑपरेशनची तयारी केली अगदी कमी वेळेत करून आम्हाला
आनंदाचा धक्का दिला खरच आनंद हास्पीटल मधील सर्वच स्टाफचा खुप आभारी आहे.
आपले सहकार्य असेच राहो. ही विनंती तसेच दवाखान्याची स्वच्छता खुप सुंदर आहे.
पुनश्च एकदा सर्व स्टाफ, आपण मॅडम यांचे शतशः आभार.
आपली विश्वासु
सौ. लक्ष्मी सचिन नांगरे
कोकरूड
राहुल संजय गुरव
मी राहुल संजय गुख रा. तडवळे. आपल्या हॉस्पीटल चे नाव ऐकून खूप होतो. माझ्या आज्जी ची तब्बेत अचानक बिघडली होती, आम्ही ठरवल आपल्याकडे दाखवून ऍडमिट करायची. ऍडमिट केल्यानंतर लगेचच आज्जी च्या तब्वेतीत सुधारण जाणवून आली. डॉक्टर सरांनी खूप चांगली औषधे देऊन तपासण्या करून घेतल्या, तसेच सरांनी सगळ्यांना आत्मविश्वास दिला, मी विशेष करून साभार मानल उमेश साहेब आणि सुधा मॅडम चे, त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला मदत केली., रात्री-अपरात्री जेव्हा गरज असेल तेव्हा. परत एकदा डॉक्टर सर आणि सर्व स्टाफ चे आभार
आपला विश्वासू
राहुल संजय गुरव
सौ. संगिता राजेंद्र साळुंखे
मी संगिता राजेंद्र साळुंखे रा. शिराळा (मुळ निगडी) आपल्या हॉस्पीटलची चर्चा खुप होते. आमच्या निगडी गावात
मी स्वतः बचत गटांचे काम करते त्यामुळे निगडी गावामध्येतर आपण डॉक्टर साहेब त्यांचा देवच आहात कारण
खुप लोक आपणाला मानतात. पण जेव्हा माझ्या मुलाला आशिषला आपल्या हॉस्पीटल मधे उपचारासाठी आणले.
दि. 14-2-2024 रोजी मी सायंकाळी ५.३० वाजता त्याला घेऊन आले. आणि आपण त्याला तपासून जे शब्द बोललात त्या शब्दांचा खुप आधार वाटला. कारण जे आपले बोलणे स्पष्ट आहे ते खुप चांगले आहे आपण कोणाची खोटे बोलून दिशाभूल करत नाही. आणि आधाराचे शब्द बोलना ते ऐकुण खरोखर अर्धा आजार आणि आम्हाला पेशेट बद्दल जी मनात भिती बसलेली असते ती दूर होते व धीर येतो.
खरंच साहेब मी ५० वर्षात अशी देवमाणसे बघीतली नाही. आपण व आपल्या मॅडम खरोखर देवच आहात. कारण मी तरी म्हणने मॅडमचा तर पुर्नजन्म झालेला आहे. कारण परमेश्वरांने त्यांना गोरगरिब जनतेची सेवा करणासाठी त्यांचा पुनर्जन्म झाला. मी नेहमी मॅडमचे उदाहरण देत असते. परमेश्वर आहे. आणि आपण दोघंही एक उदाहरण आहात.
तसेच सर आपला सर्वच स्टाफ खूप चांगला आहे. आपल्या हॉस्पीटल मधे मी ५ दिवस राहीले पण मला जरा सुद्धा वाटले नाही कि हॉस्पीटल मधे आहे. कारण घरच्या सारखे वातावरण- तसेच सर्व स्टाफची शिस्त खुप छान आहे.
आपुलकीचे नाते निर्मााण करणारे हॉस्पीटल म्हणावेसे वाटते. खर तर खुप ठिकाणी पाहीले डिस्चार्ज मिळाल्यानंतर
घरी जाताना लोक हॉस्पीटलकडे बघताना परक्या सारखे बघतात पण आपल्या आनंद हॉस्पीटलकडे लोक समाधानाने व आनंदाने बघतात. कारण आपल्या हॉस्पीटलचे नाव सुद्धा आनंद हॉस्पीटल का ठेवले असेल त्याचे उत्तर आपोआप मिळते. सर मी खुप खुश आहे माझा मुलगा चांगला झाला आपण 14-2. 2024 19-2-2024 पर्यंत जी सेवा दिली,
उपचार केले. त्याबद्दल आपले, आपल्या स्टाफचे खुप खुप आभार.
विशेष करून संध्याकाळचे जे उमेश दादा. आहेत व बिऊर च्या मावशी खुपच पेशंटची काळजी घेतात.
सर आपल्या हॉस्पीटल व आपल्या बद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. पुनश्य एकदा सर्व स्टाफ, आपण, मॅडम यांचे शतश: आभार.
आपली विश्वासू
सौ. संगिता राजेंद्र साळुंखे
स्वाती जाधव
नमस्कार
मी स्वाती जाधव रा. कापरी दि :- 06/02/2024 रोजी मी या दवाखान्यात आले. माझ्या मिस्टरची तब्येत
खराब होती त्यांना गेले ६ महिने खोकला आहे. त्यामुळे आम्हाला आनंद हॉस्पीटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. आम्ही येथे आलो डॉक्टर नितिन जाधव (सर) यांनी माझ्या मिस्टरनवर उपचार करून त्यांची प्रकृतीत चांगली सुधारना होत
आहे येथील डॉक्टर व स्टॉफचे मी आभार मानतो.
स्वाती जाधव
रा. कापरी
श्रीराम चंद्रकांत फाळके
अभिप्राय
मी श्रीराम चंद्रकांत फाळके, रा. भेडसगांव ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर, आपल्या आनंद हॉस्पीटल बद्दल मी यापूर्वी खूप ऐकले होते. अतिशय चांगले हॉस्पीटल सर्व सोयी उपलब्ध, अनुभवी डॉक्टर, तज्ज्ञ डॉक्टर हॉस्पीटलमधील सर्व स्टाफ अतिशय चांगला प्रेमळ पेशंटची काळजी घेणारा 24x7
मी 2023 पासून याच हॉस्पीटल मध्ये ट्रीटमेंट घेत आहे, जे काही मी या दवाखान्याबद्दल व येथील सर्व सोयी व स्टाफ बद्दल जे ऐकले होते ते प्रत्यक्षात अनुभवले आहे. येथील डॉक्टरांचे उत्तम उपचार पद्धती व योग्य ते मार्गदर्शन यामूळे मी तरी खूप समाधानी आहे. नक्कीच या हॉस्पीटल बद्दलचा रेफरन्स भी अनेकांना देईन धन्यवाद.
आपका विश्वासू
श्रीराम चंद्रकांत फाळके
राजु रघुनाथ कुंभार
मी राजु रघुनाथ कुंभार हातकणंगले जि कोल्हापूर माझी आईची तब्येत अचानक बिघडली आई भावा कडे गावी असल्याने त्यांचा फोन आला काय करावे काही सुचेना अशा वेळी मी भावाला सांगितलं कि मिळेल ती गाडी ठरवून शिराळ्याला ये. आमचे फॅमिली डॉ नितीन जाधव सर यांच्या कडे आल्यानंतर त्यांनी चांगल्या प्रकारे पेशंटवर उपचार सुरु केले व पेशंट बारा झाला. डॉक्टरांनी चांगले मार्गदर्शन केले येथिल सर्व स्टाफ देखील अगदी चांगल्या प्रकारे पेशंटची काळजी घेतात स्वच्छता ही छान आहे. मी आनंद हॉस्पिटल चा व सर्व स्टाफचा शत:शा आभार मानतो धन्यवाद!
मानसिंग महादेव पाटील
नमस्कार सर, मी मानसिंग महादेव पाटील रा. खिरवडे ता. शिराळा जि. सांगली येथे राहणारा माझे वडील महादेव गणपत पाटील हे दिनांक ९-१-२०२४ ला त्यांना अचानक उजवी बाजू बंद पडली व काम करणे बंद झाले व त्यांची अचानक तब्येत बिघडली त्यामुळे आमच्या आजू बाजूला राहणारे सर्व शेजारी गोळा झाले व माझ्या वडीलांची परिस्थिती पाहून सर्वजण अनेक प्रकारचे सल्ले देऊ लागले कोण सांगे कोल्हापूर /कराड /इस्लामपूर/सांगली या ठिकाणी घेऊन जावू असे सांगू लागले.
माझी आई तिथे एकटी असल्याने तिला काय करावे हे समजेना त्यामुळे तिने मला मुंबई ला फोन केला व वडिलांची परिस्थिती सांगितली पण माझ्या डोक्यायत विचार आला कि मी डॉ नितीन जाधव सर त्यांच्या बद्दल मला बाहेरून माहिती होती व माझे एक नातेवाईक सरांकडे उपचार घेत होते व त्यांना सरांनी चांगल्या प्रकारे बरे केले होते त्यामुळे क्षणाचा विचार न करता मी माझ्या आई व परिवारातील लोकांना सांगितले कि तातडीने डॉ नितीन जाधव सरांकडे घेऊन जावे.
जेव्हा माझे वडील डॉ. नितीन सर यांचा कडे आले तेव्हा त्यांनी काय प्रॉब्लेम आहे हे लगेच ओळखले व त्यांना उपचार सुरु केला व वडिलांची तब्येत स्थिरावली व त्यांना आराम मिळाला. मी गेले ५ दिवस हॉस्पिटल ला आहे, तर हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ/डॉक्टर /नर्स महत्वाचे म्हणजे साफसफाई करणारे कामगार हे दोन वेळा येउन साफसफाई करतात. हे मला फार आवडले व सर रुग्णांना पाहून लगेच काय करावे व काय न करावे सांगतात हे मला चांगले आवडले. त्यामुळे उपचार करणार्यांना चांगला उपयोग होतो त्या बद्दल मी सरांचे आभार मानतो सर तुमची सेवा अशीच चालत रहावी ही श्री चरणी प्रार्थना व आपला जो कामगार वर्ग आहे तो चांगल्या प्रकारे प्रतिसाथ देतो हे पाहून चांगले वाटले.
रितेश आवटे
मी रितेश आवटे, रा. शिराळा ४ दिवस पूर्वी माझी आई इंदुमती अशोक आवटे हिच्या पांढऱ्या पेशी वाढल्या मुळे आपल्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. डॉ. जाधव सर यांचाकडे यापूर्वी आम्ही वेगवेगळ्या कारणास्तव आलो आहोत. येथे आल्यावर डॉ. जाधव यांनी पेशंट बद्दल सर्व माहिती विचारून मगच ट्रीटमेंट चालू केली ते पेशंटला धीर देतात व तुम्हाला काही झाले नाही यातच पेशंटचा निम्मा आजार पूर्ण बरा होतो. व येथील स्टाफ ही पेशंटची विचारपूस करून त्यांना वेळच्यावेळी औषध देतात, व येथील स्वच्छता ही दिवसातून दोन वेळा केली जाते व येथील स्टाफ नर्स मेडिकल स्टाफ ही मनमिळावू आहे. आणि येथील वातावरण ही शांत आहे.
रामचंद्र मोहन गुरव
मी रामचंद्र मोहन गुरव आमचे नातेवाईक नथुराम नायकवडी यांना लिव्हर आजाराशी संबंधित कारणाने आनंद हॉस्पिटल मध्ये आलो असता आलेला अनुभव असा-
गेले ६ ७ दिवस मा डॉक्टर यांनी रोजच आम्हाला होणारे उपचार पेशंट ची स्थिती या विषयी पूर्ण माहिती देवून आमच्या शंकेचे निरसण केले डॉक्टर सहित सर्व स्टाफ ने मनमिळावू वृत्तीने आमच्या पेशंटची काळजी घेतली यासाठी हॉस्पिटल चे धन्यवाद!
मानसिंग महादेव पाटील
नमस्कार सर
दि. 15/01/2024
मी मानसिंग महादेव पाटील रा. सिखडे ता. शिराळा, जि. सांगली येथ राहणारा नातेवाईक
माझे वडिल महादेव गणपत पाटील हे दिनांक 9/01/2024 ला त्यांना अचानक उजवी बाजू बंद पडली व काम करणे बंद झाले व त्यांची अचानक तबियत बिगडली त्यामुळे आमच्या आजू बाजूला राहणारे सर्व शेजारी गोळा झाले व माझ्या वडीलाची परस्थती पाहून सर्वजन अनेक प्रकारचे सल्ले देवू लागले. कोण सांगे कोल्हापूर/ कराड / इस्लापूर/सांगली
या ठिकाणी घेवून जाऊ असे सांगू लागले त्यामुळे माझी आई तिथे एकटी असल्यामुळे तिला काय करावे हे समजेना आराम त्यामुळे तीने मला मुंबईला फोन केला व वडिलाची परस्थीती सांगितली.
पण माझ्या डोक्यात विचार आला की. मी. नितीन जाधव सरू त्याचा बदल मला बाहेरून माहिती होती व माझे एक नातेवाईक सराकडे उपचार घेत होते. व ते नातेवाईक सराने त्यांना चांगल्या प्रकार बरे करले होते त्यामुळे क्षणाचा विचार न करता मी माझ्या आई व परिवारातील लोकांना सांगितले की तातडीने डॉ नितीन जाधव सराकडे घेवून जावे.
जेव्हा माझे वडील डॉ नितीन सराकडे आले तेव्हा सरानी त्यांना काय problem आहे हे लगेच ओळखले व त्यांना उपचार सुरू केला. व वडीलाची तबेत स्थिरावली व त्यांना आराम मिळाला. मी गेले 5 दिवस Hospital आहे. तर Hospital मथील सर्व stap/doctor / नर्स / महत्वाचे मझे सापसपाई करणारे कामगार हे दोन वेळा सापसपाई करतात हे मला फार चांगले आवडले. व सर जे रुगणाना पाहून लागेच काय कराते व काही ना करावे सांगतात हे मला चांगले आवडले त्यामुळे उपचार करण्यारणा चांगला उपयोग होतो त्याबददल मी सरांचे आभार मानतो.
सर तुमची सेवा अशीच चालत राहो ही श्री चरणी प्रार्थना व आपला जो काममार वर्ग आहे तो चांगल्या प्रकारे परिसाथ देतो हे पाहून चांगले वाटले..
अपला हितचितक
(नोट * सर फक्त आपणांस सांगतो आपण जरा स्वताची जरा काळजी घेत जावे आपले जे कामगार त्यांचीही काळजी घेत जावा )
तेजेंद्र राजीव पाटील
नमस्कार
दि. 11/01/2024
मी तेजेंद्र राजीव पाटील माजी आजी श्रीमती लक्ष्मीबाई बाबुराव पाटील ही आनंद हॉस्पीटल शिराळा डॉ. नितीन
सर याची पेशंट आहे. जाधव सर हे अमच्या फॅमिलेसाखरे आम्हास उत्तम सेवा देतात. त्याचे निदान अचूक असते. त्याचा स्टॉप उत्तम सेवा देतो. हा दवाखाना उत्तम आहे
धन्यवाद
नवीन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा
विजय दळवी
मी विजय दळवी रा.शिराळा काल संध्याकाळी माझी मुलगी कु. सरगम विजय दळवी हिचा BP कमी झाल्यामुळे डॉ. जाधव मॅडम यांच्या आनंद हॉस्पिटलमध्ये या पूर्वीही वेगवेगळ्या कारणास्तव आलो आहोत. नावा प्रमाणेच इथे आनंदी वातावरण असते.
१२ तासातच हिची तब्येत सुधारत असल्याचे जाणवू लागले. इथला स्टाफ मितभाषी,मनमिळावू असल्याने घरच्या वातावरणात असल्याचे जाणवते. हॉस्पिटल मध्ये शांतता व स्वच्छता असल्याने मन प्रसन्न राहते. खरंतर अभिप्रायात लिहिण्यासारखे खूप आहे, आम्ही पूर्ण विश्वास ठेवून या हॉस्पिटल मध्ये येतो हाच आमचा अभिप्राय आहे. इथे आलं कि ५० टक्के आजार आधीच बरे होतात. निश्चिन्त राहून इलाज घेऊन आम्ही आनंदात घरी जातो. इथे सर मॅडम स्पष्ट बोलतात कोणतीही गोष्ट लपवली जात नाही. त्यांचे पुरोगामी वागणे हे मनाला भावणारे आहे. सामाजिक कार्यात त्यांनी नेहमीच आघाडी घेतली आहे त्यांचे छोटे खाणी वस्तू संग्रालय स्थापन केले असून त्यांतील आश्चर्यकारक वस्तू पाहून मन आनंदित होते. हॉस्पिटलचे उत्तम नियोजन केले असावे हे आनंद हॉस्पिटल मध्ये आल्यावर समजते इथल्या सर्व स्टाफ, मेडिकल स्टाफ, जाधव सर, मॅडम या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! व भावी वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद!
शैला प्रकाश कांबळे
नमस्कार, मी शैला प्रकाश कांबळे मी आनंद हॉस्पिटल शिराळा डॉ नितीन जाधव सर यांची पेशंट आहे. जाधव सर आमच्या फॅमिली सारखे आम्हास उत्तम सेवा देतात त्यांचे निदान अचूक असते योग्य उपचार व मार्गदर्शन मुळे आम्हाला आमचे आरोग्य चांगले राहावे यासाठी चांगला सल्ला देतात. त्यांच्या मुळे आमच्या कुटुंबातील लोक व नातेवाईक सुद्धा त्यांच्या शिवाय दुसरीकडे कुठे जात नाहीत त्यांचा स्टाफ ही चांगला तत्पर व उत्साही असतो. ते सुद्धा चांगल्या प्रकारे रुग्णांची विचारपूस करतात, सेवा करतात धन्यवाद!
शैला प्रकाश कांबळे
नमस्कार
१०/०१/२०२४
मी शैला प्रकाश कांबळे, मी आनंद हॉस्पिटल शिराळा डॉ नितीन जाधव सर यांची पेशंट आहे जाधव सर आमच्या फॅमिलीसारखे - आम्हास उत्तम सेवा देतात. त्यांचे निदान अचूक असून योग्य उपचार व मार्गदर्शनामुळे आम्हाला आमचे आरोग्य चांगले राहावे यासाठी चांगला सल्ला देतात त्याच्या मुळे आमच्या कुटुंबातील लोक व नातेवाईक सुधा
त्यांच्याशिवाय दुसरीकडे जात नाहीत. त्यांचा स्टाफहि चांगला तत्पर व उत्साही असतो.. ते सुद्धा चांगल्या प्रकारे रुग्णांची विचारपूर करतात सेवा करतात.
-
धन्यवाद
नवीन वर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा
वर्षा राहुल सावंत
नमस्कार, मी अभिप्राय देणार सौ.वर्षा राहुल सावंत.माझे संसार शिरोली (पु) ता. हातकणंगले जि. कोल्हापूर, मी उपचार साठी म्हणजेच प्रसूतीसाठी माहेर कापरी ता. शिराळा जि.सांगली येथे आले होते. तेव्हा मी आनंद हॉस्पिटल मध्ये डॉ.कृष्णा जाधव यांच्या बद्दल ऐकल्याने मी इथे प्रसूतीसाठी नाव नोंदविले. कारण माझे पप्पा डॉ. नितीन जाधव सर यांच्याकडे उपचार घेत आहेत. त्यामुळे आमचे संबंध घरातल्यान सारखे आहेत. सर मॅडम खूप छान स्वभावाचे आहेत मला जास्त काही लिहिता येणार नाही, कारण असं अचानक लिहिता येत नाही. पण इथला स्टाफ खूप छान आहे. माझी काळजी घेतली, माझ्या प्रसूती नंतर माझ्या बाळाची काळजी घेतली. मला जुळे झाले म्हणून मी बाळांची काळजी घेतली असे म्हणाले. मी हॉस्पिटल मध्ये राहायला नको म्हणत असते कारण, अस्वच्छता असते पण इथे मला घरात राहिल्या सारखं वाटलं. लिहायला तर खूप आहे पण बस करते पण एवढंच म्हणेल कि सर व मॅडम यांनी खूप चांगली विचारपूस करत काय होतंय का काही त्रास होतोय का मला तरी खूप मस्त वाटले माझे हे सहा दिवस मला जमेल तसे मी लिहिले धन्यवाद सर-मॅडम !
शामराव महादेव पाटील
नमस्कार
श्री शामराव महादेव पाटील मि माझा भाऊ युवराज आनंदा पाटील याला ( तुरुख वाडी,ता. शाहुवाडी जि. कोल्हापूर)श्री.डॉ.नितीन जाधव यांच्या बदल माहिती मिळाली आणि मि. त्याला घेऊन आनंद हॉस्पीटल आलो.त्यांचे पेशंटला सुंदर प्रकारे समजावून सांगणे शांतपणे समजावणे त्यांचा स्वभाव व हसमुख चेहरा मला फार सुंदर वाटलं डॉक्टर हा दुसरा परमेश्वर असतो त्यांच्यात मला खरोखर दुसरा परमेश्वर दिसून आला पाच हॉस्पिटल मधून मी माझ्या भावाला इथे घेऊन आलो पण इथे त्याला चांगला गुण जाणवला पेशंटची व्यवस्थित काळजी व त्यांना समजावणे हि त्यांची पद्धत मला मनापासून आवडली.
4-1-2024
गंगधर मॅडम
नमस्कार, मी अभिप्राय देणार सौ. गंगधर मॅडम जि. प. शाळा ढणापुडे ता. वाळवा जि. सांगली चार दिवसापूर्वी मी दवाखान्यात ऍडमिट झाले. त्या वेळी माझी अवस्था ठीक नव्हती, पण डॉ. नितीन जाधव व डॉ. कृष्णा जाधव यांच्या स्मित हास्य व आपुलकीपणा यामुळे माझा आजार ५० टक्के कमी झाला त्यांच्या स्टाफ मधील सर्वजण प्रामाणिक व मनमिळावू आहेत मी हॉस्पिटल मध्ये आहे असे मला वाटले नाही तर आपल्याच घरात आहे असे वाटले मी लगेच बरी झाले त्यांचे औषध उपचार फार खर्चिक नाहीत सर्व सामान्य लोकांना परवडेल असेच आहेत त्यामुळे गर्दी ही असतेच धन्यवाद!
वैभव मारुती धस
जय श्री राम,
दि. ४/६/२०२३.
नमस्कार,
मी अभिप्राय देणार श्री वैभव मारुती धस,रा. बिळाशी, येथील रहिवाशी आहे. माझी आई श्रीमती छाया मारुती यस हीस हार्ट अटॅक आल्याने दाखल झालो. आनंद हॉस्पीटल शिराळा, येथील डॉ. नितीन सरांनी आईवर उपचार सुरु केले व एक क्षणात तीचे प्राण वाचवले. अनंत रूपाने भेटन
डॉ. नितीन आधव आमच्यासाठी माणसातील देवच आहेत, त्यांचे ऋण फेडणे केवळ अशक्य आहे. या क्षेत्रात डॉक्टरांचा खुप मोठा अनुभव आहे. शिराळा पंचक्रोशी व सांगली, कोल्हापूर सात अशा अनेक जिल्ह्यातून पेशंट मोठ्या विश्वासाने उथे येतात आणि बरे होवून परत आतात.
असतो.
या आधही माझ्या आईला आम्ही इथे अॅडमिट केले होते. वर्षापूर्वी म्हणजे २०-२२ माझ्या वडिलांनाही इथेच उपचार घेतले होते. व सर्व वेळी आम्हाला खुप चांगला अनुभव आला आहे. ट्रिटमेंट काळजीने व तत्परतेने देतात. लक्ष घालून दिवसातून ते सर्व वारेवार भेट देतात व पेशंटच्या वेदना व आजार बरा करण्यावर भर देतान सर्वोत्तम इलाज व माफक मोबदला (बिल) ही त्यांची खाशियत आहे. ते परिस्थिती जाणून प्रसंगी बिल कमीही करतात. आपल्या परिसरात म्हणूनच त्यांचा मोठा नावलौकीक आहे. ते सांगली जिल्हयाचे भूषण आहेत. नातेवाईकांना समजावून सांगण्याची पद्धत फार प्रभावी आसून त्यात कमालीची पारदर्शकता, सकारात्मकता व विश्वासार्हता असते.
हॉस्पीटलमधील सर्व स्टाफ खुप मनापासून सेवा देतात. त्यांच्यामध्येही खूष समजूतदारपणा यांची कर्तव्यदक्षता वाखाणण्याजोगी आहे. विशेषकरून उमेश सर, माधवी सिस्टर यांचा सेवाभाव व कार्यतत्परता प्रभावित करणारी आहे.
सर्व स्टाफ डॉक्टरांनी योग्य ट्रेनिंग देवून तयार केला आहे व त्याच्या स्वभावाची छवी सर्व स्टाप मध्येही उतरलेली अढळते.डॉक्टर व मॅडम सो. कृष्णा जाधव याचे बारिक लक्ष पेशेट्च्या ईम्प्रूव्हमेंटवर असते.त्यांच्या कामावर फोकसउ असलेले आढळून येते. याबद्दल त्यांची निष्ठा प्रामाणिकपणा व स्कोल माझ्यासारख्या छोट्या मानसाने बोलने म्हणजे सुर्याबद्दल काजल्याने सांगण्याप्रमाणे आहे. आयुआरोग्य देवगे व त्याच्या हातून समाजहिताचे कार्य अखंडपणे
रुग्णसेवेचे, राहो हीच मनस्वी प्रार्थना करतो, त्यांच्या कार्याला सदिच्छा अर्पण करतो. त्याचे व त्यांच्या सर्व स्टाफचे आभार व सर्वांना त्याच्या सत्कार्यास
चिंततो व अनेक अनेक सुभेच्छा देतो.
जय हींद, जय भारत.
मी माझी एक कविता डॉक्टरांच्या कार्याला समर्पित वैभव घस. बिळाशी मी अनेक सामाजिक अध्यात्मीक कविता लिहील्या आहेत त्यापैकीच माझी ही एक कविता यात जिथे जिथे मी कविता असे म्हंतले आहे. तिथे तुम्ही डॉक्टर जाधव सर असे वाचा. म्हणजे सोपे जाईल कवितेचं शर्षिक आहे -
जाईल-नगाड
" कवितेने वेचले नसते तर ........
कवितेने वेचले नसते तर सारे विस्कटून गेले असते आयुष्य,
कवितेने शिवले म्हणून फार बरे झाले,
नाहीतर असेच फाइन गेले असते आयुष्य."
आज माणसाला माणूस ओळखत नाही अशा टप्प्यावर येऊन पोहचलो आहोत आपण. कविता अजून हि मनाला जपते आहे, धडपडणाऱ्या माणसाकडे आपलेपणाने बघते आहे, मी हात न जोडता हि दिले आशीर्वाद कवितेने, नाहीतर असे कोणी जवळ केले असते ममतेने. खरंच कवितेने शिवले म्हणून फार बरे झाले नाही तर असेच फाटून गेले असते आयुष्य.
अहो संकटांचे सोडून द्या, त्यांची रोजचीच असते खिरापत. पण भीती असते तरी कितपत? घामेजलेल्या माणसासाठी कवितेचा आजही मोकळा आहे पदर, आणि तिच्याशिवाय आपली अशी कोण करतो कदर.
खरंच कवितेने शिवले म्हणून फार बरे झाले, नाहीतर अशेच फाटून गेले असते आयुष्य. कवितेने वेचले नसते तर सारे विषयातून गेले असते आयुष्य.
धन्यवाद!
वसंत रावजी लोहार
नमस्कार, मी वसंत रावजी लोहार,
रा. राकुर्डे बु ता. शिराळा, जि. सांगली.
मी माझ्या मनापासून श्री आनंद हॉस्पिटल शिराळा यांना अभिप्राय देतो कि, डॉ. श्री. नितीन जाधव यांची सेवा चांगलीच असते व निस्वार्थी असते पेशंटची लुबाडणूक होत नाही. योग्य फी आकारली जाते आजार छोटा व बिल मोठे असे कधीही केले नाही.
आम्ही ४० वर्षे पासून इथे पेशंट म्हणून येतो पण कसलीही फसवणूक नाही. त्यांची सेवा सामान्यांना अतिशय प्रामाणिक आहे व कमीच दराची आहे तसेच दवाखान्यात शांतता, सेवा, रिझल्ट, आपुलकी, दैवीभाव , माणुसकी जाणून आली डॉक्टर, सिस्टर, इतर स्टाफ सुद्धा सेवा चांगल्या देतात व सर्वांचे आभार मानतो.
उत्तम दगडू माने
नमस्कार,
मी उत्तम दगडू माने ता. शिराळा, जि. सांगली मी माझ्या मनापासून माझा अभिप्राय देतो कि, डॉ. श्री. नितीन जाधव यांची सेवा चांगलीच असते व निस्वार्थी असते पेशंटची लुबाडणूक होत नाही. योग्य फी आकारली जाते आजार छोटा व बिल मोठे असे अज्जीबात केले जात नाही.
आम्ही खूप दिवसं पासून इथे पेशंट म्हणून येतो पण आतापर्यंत असे अजिबात आम्हाला आढळून आलेले नाही. त्यांची सेवा सामान्यांना अतिशय प्रामाणिक आहे व तसेच दवाखान्यात शांतता, सेवा, रिझल्ट, आपुलकी, दैवीभाव, माणुसकी जाणून आली डॉक्टर, सिस्टर सुद्धा सेवा चांगल्या देतात व सर्वांचे आभार मानतो.
हरिश्चंद्र वसंत ठाकर
श्री. स्वामी समर्थ
नमस्कार,मी. खालीलप्रमाणे सही करणार श्री. हरिश्चंद्र वसंत ठाकर रा. कांदे ता.शिराळा जि. सांगली अभीप्राय लिहून देतो की,
दि. २२-५-२०२३ रोजी मला धापेचा तास माझ्या लिव्हरला सुज आली त्यामुळे मी.श्री डॉ नितीन जाधव व सौ-डॉ. कृष्णा जाधव यांच्या शिराळा येथील (आनंद हॉस्पीटल) मांगले रोड या ठिकाणी आलो असता. डॉ. जाधव यांनी माझी प्राथमिक आरोग्य तपासणी केली व ऍडमिट करून घेतले. डॉ. जाधव व त्यांच्या पत्नी यांनी माझ्यावर चांगले प्रकारे उपचार केले. व माला शुक्रवार दि.२६-५-२०२३ पर्यंत व्यवस्थित केले. व त्यांची उपचार पद्धत चांगली आहे. तसेच सदर दवाखान्यामधील महिला व पुरुष १५ कर्मचारी यांनी अतिशय उत्तम प्रकारे सेवा करून सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केले. तसेच दवाखाना भरपूर मोठा असून सदर दवाखान्यामध्ये सर्व सोयी व सुविधा आहेत त्याबदल दवाखान्याचे ऋणी मी आहे.सहकार्य केले,तसेच दवाखाना भरपूर मोठा असून सदर दवाखान्यामध्ये सर्व सोयी व सुविधा आहेत.धन्यवाद!
कळावे.
आपला विश्वासू
श्री. हरिश्चंद्र वसंत ठाकर
सुषमा कृष्णा उगळे
नमस्कार,
मी सुषमा कृष्णा उगळे, रा.- ता.चिखली जि. सांगली, दि. 29-04-2023 रोजी माझी प्रसूती आनंद हॉस्पीटल, शिराळा येथे मला मुलगा झाला. दि. 29-03-2023 रोजी सर्वप्रथम डॉ. सौ. कृष्णा जाधव मॅडम यांच्याकडे मी मुंबईवरून उपचारकामी आले. जाधव मॅडम यांनी खूपच चांगल्या प्रकारे समुपदेशन करून चांगले ट्रीट केले. गर्भावस्थेतील ज्या काही मला समस्या होत्या त्यांचे अतिशय सोप्या पद्धतीने विश्लेषण करून बाबी समजावून सांगितल्या, तसेच डॉ.जाधव सर यांनीही वेळोवेळी मार्गदर्शन केले.
दि. 29.04-23 ते 05-04-23 रोजी दरम्यान आनंद हॉस्पीटल येथे प्रसूतीकरिता ऍडमिट असतानाही हॉस्पीटलमधील सर्व नर्स स्टाफ ( महिला-पुरुष) यांनीही खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केले. काळजी घेतली. तसेच हॉस्पीटल मधील स्वच्छता ही वाखाणण्याजोगी आहे. माझ्या माहीतीतील इतर कोणी नातेवाईक यांनाही मी या हॉस्पीटलबाबत नक्की रेफर करेन.
धन्यवाद,
सोनाली पाटील
नमस्कार,
मी सोनाली पाटील रा. बिळाशी दि:- 06/०२/२००७ रोजी माझ्या आईची तब्येत बिघडली होती, म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले नितीन जाधव (सर) आनंद हॉस्पीटल येथे तिला घेऊन आलो. त्यावेळी आमच्या आईची परिस्थिती क्रिटिकल होती पण आनंद हॉस्पीटल मध्ये सरांच्या प्रयत्नामुळे तसेच आनंद हॉस्पीटल मध्ये कार्यरत असलेल्या स्टाफमुळे आमच्या मनातील भितीचे वातावरण कमी झाले तसेच सध्या पाहता तिची परिस्थिती मध्ये सुधारणा
होत आहे. त्यामुळे आनंद हॉस्पीटल मधील डॉक्टर व सर्व स्टाफचे आभार मानतो.
(सोनाली पाटील)
रा. बिळाशी