आनंद हॉस्पिटलच्या डॉ. कृष्णा जाधव यांचा सत्कार

आनंद हॉस्पिटलच्या डॉ. कृष्णा जाधव यांचा सत्कार
लोकशाही । कोकरूड

शिराळा येथील आनंद हॉस्पिटलच्या माध्यमातून महीलांना वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉ. सौ. कृष्णा नितीन जाधव यांचा शाहुवाडी तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागात उदगीरी येथे डॉ. एस. एन. पाटील फौंडेशन च्या मार्फत घेण्यात आलेल्या मोफत सर्व रोगनिदान शिबिरात आलेल्या महीलांची मोफत तपासणीची सेवा दिल्याबद्दल डॉ. एस. एन. पाटील फौडेशनच्या संचालिका डॉ. प्रज्ञा पाटील यांच्या हस्ते. शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. डॉ. कृष्णा जाधव यांनी आत्तापर्यंत शाहुवाडी तालुक्यातील विविध आरोग्य शिबीरात मोफत आरोग्य तपासणी सेवा, विविध ठिकाणी महीलां मेळाव्यात महीलांना आरोग्य विषयक मार्गदर्शन केले आहे.

यावेळी बोलताना डॉ. सौ. कृष्णा जाधव म्हणाल्या की, धन्वंतरी हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. एस. एन. पाटील यांच्या फौंडेशनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबीरात आम्हाला उदगीरी सारख्या दुर्गम डोंगरी भागातील महीलांची वैद्यकीय तपासणी करण्याची संधी मिळाली. या दुर्गम भागातील खरच वैद्यकीय सेवेची गरज असुन येथे सेवा दिल्याचा आनंद होत आहे. यावेळी डॉ. एस. एन. पाटील, पतसंस्थेच्या चेअरमन उषाताई पाटील, संचालक डॉ. पंकज पाटील, डॉ. विनायक महानवर, कु. शरयू जाधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *