गर्भलिंग तपासणीविरोधात शिराळ्यात जागृती मोहीम
शिराळा, ता. ८ : आईच्या दुधातून बाळास रोगप्रतिकारक शक्ती मिळते, अशी माहिती डॉ. सौ. कृष्णा जाधव यांनी दिली.
येथील अंगणवाडी क्रमांक ९४ व ९६ मध्ये जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त गर्भलिंगविरोधी जनजागृती मोहिमेचा कार्यक्रम उत्साहात झाला. प्रकल्प अधिकारी बी. सी. पाटील अध्यक्षस्थानी होते.
डॉ. जाधव म्हणाल्या, “स्तनपान ही नैसर्गिक देणगी आहे. आईच्या दुधाला पर्याय नाही. आईच्या दुधातून बाळाला नैसर्गिक प्रतिकारक शक्ती मिळते. यासाठी सरकारने अनाथ मुलांसाठी ‘मिल्क’ बँकेची स्थापना केली आहे. गर्भलिंग तपासणीविरोधी जागृती होणे गरजेचे आहे.”के. बी. कांबळे यांनी प्रास्ताविक केले. सेविका सौ. लता हराळे, मदतनीस सौ. शालन ठाकर व अक्काताई कांबळे यांनी संयोजन केले. सेविका ज्योती जोशी यांनी आभार मानले.