पुणे वैभव
शिराळा प्रतापराव शिंदे
शिराळा येथील डॉ. नितीन जाधव *एमडी मेडिसिन * यांनी आनंद हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा बजावत जिद्द आणि चिकाटीच्या जोरदार नुकतीच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबई या आंतरराष्ट्रीय संस्थेची संगीत विशारद (गायन) ही अत्यंत मानाची पदवी मिळवली. याबद्दल शिराळा परिसरातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे. डॉ. नितीन जाधव यांना पहिल्या पासून संगीत गायनाची आवड होती. जाधव घराण्याला आजोबा शाहीर के गणपतराव जाधव यांचा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. डॉ. जाधव यांचे क्षेत्रातील प्रारंभीचे शिक्षण काका कै. विश्वासराव उर्फ बबनराव जाधव यांच्याकडे झाले. तसेच इस्लामपूर येथील पंडित हणुमंतराव जाधव (पप्पा) यांच्याकडे सतत पंधरा वर्षे त्यांना बहुमोल मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या प्रेरणेनेच गाणे प्रभावी होत जाऊन त्यांना योग्य दिशा मिळाली. सध्या ते संगीतालंकार श्री विजय दळवी सर यांच्याकडे गेली सात आठ वर्ष संगीताचे शिक्षण घेत आहेत डॉ. नितीन जाधव हे संगीताचे शिक्षण घेत असताना पंडित अशोक कुलकणी (कडेगाव) कैलास सावंत, सौ वंदना कांबळे , संगीत अलंकार पंडित लोहार सर (पेठ), तसेच तबला अलंकार , गायन विशारद संतोष अंगापूरकर (तळसंद) आदींची मोलाची मदत, * मार्गदर्शन* झाले. या संपूर्ण प्रवासात डॉ. जाधव यांना तबल्याची साथ संगीत तबला विशारद सतीश पाटील इस्लामपूर, संगीत तबला विशारद केदार चव्हाण, शशांक चव्हाण शिराळा तसेच स्वर साधना रेकॉर्डिंग स्टुडिओचे विक्रम दाभाडे उल्हास कांबळे, पी. एस. कांबळे आदींची बहुमोल साथ लाभली. डॉ. जाधव यांनी मिळवलेल्या यशा बद्दल तालुक्यातून विशेष कौतुक होत आहे.
सर्वांच्या सहकार्यामुळे ही मानाची संगीत विशारद पदवी मिळवू शकलो-डॉ. नितीन जाधव.
माझा संगीताचा रियाज चालू असताना माझे पेशंट्स हॉस्पिटलची आणि घराची संपूर्ण जबाबदारी डॉक्टर सौ कृष्णा जाधव यांनी समर्थपणे सांभाळली. त्यांची विशेष मोलाची साथ. माझा हुरूप वाढवून अनेक टेन्शन्स कमी करण्यात
तरबेज असलेल्या आमच्या दोन्ही मुली शरयू आणि शवरी यांच्या प्रोत्सानामुळे प्रेरणेमुळे तसेच माज्या प्रत्येक कार्यात माज्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या आनंद हॉस्पिटलच्या सर्व स्टाफ, सहकारी यांच्या पाठबळामुळे तसेच आई कै. कुसुम व वडील कै. बाळासाहेब जाधव (तात्या) यांच्या आशीर्वादामुळेच मी संगीत विशारद ह्या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या पदवीला गवसणी घालू शकलो.