शिराळा, ता. 5: सांगूली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात डॉ. जाधव मियावाकी जंगल निर्मिती
प्रकल्पाचा पहिला वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.
जंगलाचा वाढदिवस साजरा करण्याचा हा पहिलाच उपक्रम असल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
येथील डॉ. नितीन जाधव व डॉ. कृष्णा जाधव या दाम्पत्यांनी प्लॅनेट अर्थ
फाउंडेशनच्या मदतीने शिराळा येथे डॉ. जाधव मियावाकी जंगल या प्रकल्पाची
1 वर्षापूर्वी निर्मिती केली आहे. त्यास एक वर्षे पूर्ण झाल्याने या मियावाकी जंगलाचा
वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात
दिपप्रज्वलनाने न करता झाडांच्या टोपांचे पूजन करून करण्यात आली. या
प्रकल्पामध्ये 52 प्रकारची 550 हून अधिक विविध प्रकारची देशी पद्धतीची झाडे
लावण्यात आली आहे. या एका वर्षात या झाडांची उंची 12 ते 15 फूट उंच झाली आहे.
या झाडांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिले जात आहे.
यावेळी प्रा. विजयकुमार जोखे, बाळकृष्ण खुर्द, डॉ. नितीन जाधव, डॉ. कृष्णा जाधव,
अँड. नरेंद्र सुर्यवंशी, नगरसेविका नेहा सुर्यवंशी, प्लॅनेट अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष
आकाश पाटील, उपाध्यक्ष प्रणव महाजन, सचिन मिरजकर, डॉ. दीपक यादव, एम.डी.
गायकवाड, माजी नगराध्यक्षा सुनंदा सोनटक्के, डॉ. आबासाहेब पाटील, डॉ. प्रभाकर
पाटील, वैभव नायकवडी, समीर पिरजादे, डॉली ओसवाल, डॉ. शिल्पा कुरणे उपस्थित
होते.