नाईक इंडोमेंट ट्रस्टच्या वतीने वैद्यकीय सेवा पुरवू : आ. नाईक

शिराळा: वार्ताहर
वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन शोध व तंत्रज्ञान याची माहिती डॉक्टरांनाहोण्यासाठी फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंट ट्रस्टच्या वतीने कार्यशाळा आयोजित करून रुग्णांना
अद्ययावत वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यादृष्टीने वाटचाल सुरू करण्याची आमची तयारी आहे, असे प्रतिपादन आ.मानसिंगराव नाईक यांनी केले.

डॉक्टर्स डे निमित्त शिराळा येथील लायन्स क्लबमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. क्लबचे अध्यक्ष प्रमोद नाईक अध्यक्षस्थानी होते. डॉ. एम. एन.
मुल्ला, डॉ. नितीन जाधव, डॉ. श्रीकांत सागावकर, डॉ. एस. वाय. कुलकर्णी आदी उपस्थित होते.

नाईक म्हणाले, चिखली लायन्स क्लबने भाटशिरगाव येथे बहुउद्देशीय सभागृह बांधून या भागातील जनतेला दिलासा दिला आहे. गोरगरीब जनतेची गैरसोय दूर केली आहे. डॉ. नितीन जाधव म्हणाले, पंजाब, हरियाणा या राज्यात स्त्रियांचे प्रमाण घटले आहे. स्त्रीभ्रूण हत्त्या रोखणे जरुरीचे आहे. दोषी डॉक्टरांना शिक्षा झाली पाहिजे. घनःश्याम आवटे यांनी स्वागत केले. प्रमोद नाईक, प्रताप पाटील,अजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. साईनाथ पाटील,
डॉ. विक्रम इंगवले,डॉ. कांचन इंगवले, डॉ. सलीम मुल्ला, डॉ. जयश्री नलवडे, डॉ. अजीम मुल्ला, डॉ. विनायक धस, डॉ. प्रदीप काकडे,
डॉ.अरुण पाटील, डॉ. विजय यादव उपस्थित होते. सुनीलू कवठेकर यांनी आभार मानले.

पुढारी
३/७/२०१२

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *