शनिवार दि.६-१-२०२४ हा पत्रकार दिन म्हणून ओळखला जातो. पत्रकार दिनाचे औचित्य साधून संत गाडगे महाराज सभागृह, शिराळा येथे जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा, हिरकणी व इतर सात संस्था मिळून शिराळा तालुक्यातील सुमारे २५ पत्रकारांचा पुष्पगुच्छ आणि फोटो फ्रेम देऊन सत्कार आणि सन्मान करण्यात आला.
यावेळी ग्राहक पंचायतीचे मान्यवर अनंत खोचरे व हंबीरराव देशमुख हेही उपस्थित होते. डॉ.सौ. कृष्णा जाधव यांनी प्रास्ताविकात पत्रकारांचे समाजातील महत्त्व विषद केले.
सर्व पत्रकार समाजाच्या समस्या मांडणे त्याच्या निराकरणाच्या दृष्टीने कसे प्रयत्न करता येईल हे मांडणे तसेच सांस्कृतिक, शास्त्रीय, ऐतिहासिक, राजकीय गोष्टींचा उहापोह करणे हे महत्त्वाचे काम करतात.
समाजासाठी ते 24 तास तत्पर असतात. ह्या पत्रकारितेचा आणि पत्रकारांचा सन्मान झालाच पाहिजे. असे त्या म्हणाल्या. ॲड.सौ. नेहा सूर्यवंशी यांनी कायद्याबद्दल माहिती दिली. ग्रुपच्या अध्यक्षा सौ. सरोजिनी कदम त्यांनी ग्रुप बद्दल माहिती दिली.
आभार उपाध्यक्ष प्रज्ञा चरण कर यांनी केले. कार्यक्रमासाठी 100 लोक उपस्थित होते.