भाटशिरगाव येथे रविवारी
निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम
शिराळा : येथील मेडिकल संघटना व ‘इपका लॅबोरेटरी’ यांच्यामार्फत रविवारी (ता. १८) भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील लायन्स सेवा केंद्रात निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमास सुरवात होईल. ही माहिती संघटनेच्या अध्यक्ष सौ. कृष्णा जाधव यांनी दिली.
त्या म्हणाल्या, “वैद्यकीय क्षेत्रात दररोज रोग निदान, उपचार पद्धतीमध्ये नवनवीन शोध लागतात. ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणाऱ्या सर्व डॉक्टरांपर्यंत हे अद्ययावत ज्ञान पोचविण्यासाठी ही ‘सी.एम.ई’ आयोजित केली आहे. यामध्ये तीन तालुक्यांतील सुमारे दीडशेवर डॉक्टर सहभागी होणार आहेत. या वेळी विविध विषयांवरील तज्ज्ञ डॉक्टरांचे चर्चासत्र होणार आहे. प्रामुख्याने डॉ. शरद घाटगे (सांगली) यांचे लहान मुले व त्यांचे आजार, डॉ. सौ. प्रीती देशपांडे (कऱ्हाड) स्त्रियांमधील समस्यावरील अद्ययावत उपचार पद्धती, डॉ. धनंजय चव्हाण (कन्हऱ्हाड) त्वचा विकार निदान व आधुनिक उपचार यांवर मार्गदर्शन करणार आहेत. त्यासाठी तालुक्यातील सर्व डॉक्टरांनी उपस्थित राहून मार्गदर्शनाचा फायदा घ्यावा.”
सकाळ
कोल्हापूर : मंगळवार, १६ जानेवारी २००७