महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी – डॉ. कृष्णा जाधव

शिराळा (लक्ष्मीपुत्र)

महीलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन  प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉ. कृष्णा नितीन जाधव यांनी केले. त्या महिला आर्थिक विकास महामंडळ सांगली अंतर्गत भाग्योदय लोकसंचलित साधन केंद्र शिराळा यांची १३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बिऊर (ता. शिराळा) येथील संकल्प हॉल येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.

यावेळी बोलताना डॉ. जाधव पुढे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महीलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधावी. ग्रामीण भागात महीलांना कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु महीलांनी आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळत आपल्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करू नये. मुला मुलींना समान वागणूक दिली पाहिजे. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी महीलांनींच पुढाकार घेतला पाहिजे. कुंदन शिनगारे यांनी बचत गटाचे काम कसे करायचे, पारदर्शक कारभार कसा ठेवायचा. बचत गटाच्या माध्यमातून उद्योग कसा चालवयचा अशी सविस्तर माहिती सांगितली. याप्रसंगी उद्योजिका महिला व बचत गटांचे सत्कार घेण्यात आला.

यावेळी वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे, सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी कल्पेश उमराणीकर, मुख्य अधिकारी  एस. के. व्ही. के. बँक ऑफ इंडिया दिपक वानकर, बँक ऑफ इंडिया शिराळा शाखेचे कृषी अधिकारी अनिल चोरमारे, बँक ऑफ इंडिया प्रशिक्षण विभागाचे महेश पाटील, राजेंद्र गुंगे आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी अध्यक्षा स्वाती पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सचिव सविता कांबळे यांनी सभेचे नोटीस वाचन केले. व्यवस्थापक संगीता स्वामी आर्थिक वर्षाच्या कामाचा आढावा, शाश्वतता आराखडा,सब प्रोजेक्ट विषयी माहिती दिली.

कार्यक्रम पार पडण्यासाठी माविमच्या शिराळा तालुका व्यवस्थापक संगीता स्वामी, लेखापाल अर्पिता नलवडे, सहयोगिनी रुपाली निकम, उषा शेवडे, प्रतिभा पोतदार, यशश्री यादव, स्मिता सावंत, सुरेखा रेणके आदींसह प्रमुख पदाधिकारी महीलांनी केले. या कार्यक्रमास कार्यकारणी, संपूर्ण शिराळा तालुक्यातील बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *