महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी – डॉ. कृष्णा जाधव

महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी – डॉ. कृष्णा जाधव
शिराळा / प्रतिनिधी
महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. कृष्णा नितीन जाधव यांनी केले. त्या महिला आर्थिक विकास महामंडळ सांगली अंतर्गत भाग्योदय लोकसंचलित साधन केंद्र शिराळा यांच्या वतीने आयोजित बिऊर (ता. शिराळा) येथील संकल्प हॉल येथे कार्यक्रमात बोलत होत्या.

डॉ. जाधव पुढे म्हणाल्या की, ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधावी. ग्रामीण भागात महिलांना कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु महिलांनी आपली कौटुंबिक जबाबदारी सांभाळत आपल्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करु नये. मुला-मुलींना समान वागणूक दिली पाहिजे. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेतला पाहिजे. कुंदन शिनगारे यांनी बचत गटाचे काम कसे करायचे, पारदर्शक कारभार कसा ठेवायचा, बचत गटाच्या माध्यमातून उद्योग कसा चालवयचा याबाबत सविस्तर माहिती सांगितली. उद्योजिका महिला व बचत गटांचे यावेळी वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी कुंदन शिनगारे, सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी कल्पेश उमराणीकर, मुख्य अधिकारी एस. के. व्ही. के. बँक ऑफ इंडिया दीपक वानकर, बँक ऑफ इंडिया शिराळा शाखेचे कृषी अधिकारी अनिल चोरमारे, बँक ऑफ इंडिया प्रशिक्षण विभागाचे महेश पाटील, राजेंद्र गुंगे आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी अध्यक्षा स्वाती पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

सचिव सविता कांबळे यांनी सभेचे नोटीस वाचन केले. व्यवस्थापक संगीता स्वामी आर्थिक वर्षांच्या कामाचा आढावा, शाश्वतता आराखडा,सब प्रोजेक्ट विषयी माहिती दिली.
हा कार्यक्रम पार पडण्यासाठी माविमच्या शिराळा तालुका व्यवस्थापक संगीता स्वामी,लेखापाल अर्पिता नलवडे, सहयोगिनी रुपाली निकम, उषा शेवडे, प्रतिभा पोतदार, यशश्री
यादव, स्मिता सावंत, सुरेखा रेणके आदींसह प्रमुख पदाधिकारी महिलांनी केले. यावेळी कार्यकारिणी, शिराळा तालुक्यातील बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित
होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *