महिलांमध्ये चांगली जागृती निर्माण होत आहे. महिला घरातून बाहेर पडून आता सामाजिक कार्यक्रमात पुढे येऊ लागल्या आहेत. उपस्थित महिलांना भेट वस्तूंचे वाटप केले.
कृष्णा जाधव: सागाव / वार्ताहर आजच्या धावपळ व ताणतणावाच्या युगात पुरुषांच्याबरोबरच महिलांमध्येही आरोग्यविषयक तक्रारी वाढत चालल्या आहेत. त्यासाठी महिलांनी आपल्या आरोग्याविषयी जागरुक राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. कृष्णा जाधव यांनी केले.
सागाव (ता. शिराळा) येथे भाग्योदय लोकसंचलित साधन केंद्र, संचलित प्रियदर्शनी महिला गाव विकास समितीच्यावतीने आयोजित मेळाव्यात महिलांच्या आरोग्यविषयक समस्या या विषयावर व्याख्यान झाले.
अध्यक्षस्थानी विद्या पाटील होत्या. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक डॉ. जयश्री पाटील यांनी केले. डॉ. जाधव म्हणाले, आजाराबाबत महिला स्पष्टपणे बोलत नाहीत. समस्यांविषयी न बोलल्यामुळे महिलांच्या आरोग्यविषयक तक्रारी वाढत चालल्या आहेत. त्यामुळे महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा समस्या उद्भवू नयेत, यासाठी प्रत्येक महिलेने आरोग्यविषयी उदभवणाऱ्या तक्रारीची माहिती डॉक्टरांना दिली पाहिजे.
विद्या पाटील म्हणाल्या, गावविकास समितीच्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम राबविले जातात. त्यातून 2018 यावेळी उज्वला देशमुख, शारदा
जाधव, गीता पाटील, सुनीता पाटील, रोहिणी जाधव, मधुबाला कांबळे, अश्विनी कांबळे, मनीषा सातपुते, सुरेखा पाटील, वनिता जाधव, श्वेता शिंदे, राजश्री पाटील, शोभा नाकील. वंदना पाटील, संजिवनी पाटील, शुभांगी पाटील, संगीता स्वामी, स्वाती पवार, उषा शेवडे, रुपाली निकम, रोहित घोरपडे, अमर मोहिते आदींसह महिला उपस्थित होत्या.