‘महिलांनी मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक’
शिराळा / प्रतिनिधी ■ काळजी घेतली जात नाही. त्यासाठी स्त्रीयांनी स्वतः महिलांनी शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन वैद्यकीय संघटनेच्या अध्यक्षा सौ. डॉ. कृष्णा जाधव सोनोग्राफीच्या तंत्राचा दुरूपयोग करून मुलींची हत्या यांनी केले.
गुरुवर्य स्व. हसबनीस प्रतिष्ठान व स्वरूप लॅबोरेटरी मार्फत घेण्यात आलेल्या महिला आरोग्य शिबिर झाले. या शिबिराच्या डॉ. कृष्णा जाधव होत्या.
शिराळा येथील तरूण मित्र वाचनालयाच्या सभागृहात झालेल्या या शिबिरात प्रास्ताविक सौ. अनिता कुलकर्णी यांनी केले. डॉ. सौ. जाधव यांनी डी. के. हसबनीस यांच्या तर डॉ. सौ. सुषमा देशपांडे यांनी धन्वंतरी प्रतिमेचे पूजन केले. यावेळी डॉ. जाधव म्हणाल्या स्त्रीच्या आरोग्याची कुटुंब प्रमुखाकडून योग्य ती काळजी स्वतःच घेतली पाहिजे. मुलगी वयात आल्यानंतर आईने तिची मैत्रीण होणे गरजेचे आहे. डॉ. सुषमा देशपांडे म्हणाल्या, मन साश्वत असेल तरच शरीर तंदरूस्त रहाते. आपली सध्याची जीवन शैली बदलण्याची गरज असून संस्कृतीला धरून जगण्याचे तंत्र आत्मसात केले पाहिजे. हा कार्यक्रम यशवस्वी करण्यासाठी दिनेश हसबनीस, किशोर हसबनीस, स्वरूप लॅबचे प्रमुख प्रमोद काकडे, यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सौ आशा नलवडे यांनी केले तर आभार सौ वैजयंती हसबनीस यांनी मानले.
१६/११/०६
है, तरुण भारत