महिलांनी मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्यावे
शिराळा, दि. २१ (वार्ताहर) :
स्त्रीच्या आरोग्याची कुटुंबप्रमुखांकडून काळजी घेतली जात नाही. म्हणून महिलांनी स्वतः शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिराळा मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. सौ. कृष्णा जाधव यांनी केले.
येथील गुरुवर्य डी. के. हसबनीस, स्मृती प्रतिष्ठान, मेडिकल असोसिएशन व स्वरूप लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला आरोग्य परिसंवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. डॉ. सौ. सुषमा देशपांडे, डॉ. सौ. क्षमा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. जाधव म्हणाल्या, मुलगी वयात आल्यावर आईने तिची मैत्रीण होणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेक समस्या सुटू शकतील. स्त्री कुटुंबासाठी राबत असते, पण ती स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. सोनोग्राफीच्या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग स्त्री भ्रूणहत्येसाठी होणे, ही बाब गंभीर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. सौ. देशपांडे म्हणाल्या. महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्नांसाठ संयोजकांनी प्रथमच व्यासपीठ निर्माण केले आहे. मन हे आपले सातवे इंद्रीय आहे. ते सशक्त असेल, तरच शरीग तंदुरुस्त राहते. संस्कृतीला धरून जगण्याचे तंत्र आत्मसात केले पाहिजे. असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी हसबनीस व धन्वंतरीच्य प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सौ अनिता कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले सौ. आशा नलावडे यांनी सूत्रसंचालन केले. सौ. वैजयंती हसबनीस यांन आभार मानले.