शिराळा तालुक्यातील डोंगरी भागात डॉक्टरांचे काम उल्लेखनीय

शिराळा
शिराळा तालुका डोंगरी तालुका असून विखुरलेला आहे.अशा परिस्थितीत डॉक्टरांचे काम उल्लेखनीय असून डॉक्टर व रूग्ण यांचे संबंध जिव्हाळ्याचे असावेत, असे प्रतिपादन आ.मानसिंगराव नाईक यांनी केले.लायन्स क्लब ऑफ शिराळा टाऊन यांच्यावतीने आयोजित केलेल्या ‘डॉक्टर्स डे’ कार्यक्रमात ते बोलत होते.

समाजात ईश्वरूपी सेवा देणारे डॉक्टर व त्यांच्या कार्याचा बहुमान करण्याकरिता लायन्स क्लब ऑफ शिराळा टाऊनचे संस्थापक ला. प्रमोद नाईक यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

यावेळी बोलताना लोकनेते कै..टाऊन यांच्यावतीने फत्तेसिंगराव नाईक इंडीमेन्ट ट्रस्टच्यावतीने वैद्यकीय व्यबसायामध्ये नवीन तंत्रज्ञानाची सखोल माहिती ग्रामीण भागातील वैद्यकीय व्यावसायिकांना मिळावी, याकरिता शिराळा मेडिकल असोसिएशनने पुढाकार घेऊन कार्यशाळा आयोजित करावी.
कार्यशाळेस (सी.एम.ई) लागणारे सर्व प्रकारचे सहकार्य ट्रस्टच्यामार्फत करण्याचा मनोदय त्यांनी यावेळी बोलून दाखविला.

डॉक्टरांच्यावतीने सत्कारास उत्तर देताना डॉ. नितीन जाधव म्हणाले, सध्या रूग्ण व डॉक्टर यांच्यातील संबंध दुरावत चालले आहेत. त्याचा फटका रूग्ण व डॉक्टर दोघांनाही बसतो. रूग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्यातील योग्य परिस्थितीचे योग्य आकलन न झाल्यामुळे डॉक्टरांबद्दल नाहक गैरसमज
करून घेतले जातात व त्यामुळे हे संबंध ताणले जातात. असे होऊ नये म्हणून एखादी आपत्कालीन समिती स्थापन करावी.आमची संघटना वैद्यकीय नीतिमूल्य न जपणाऱ्या डॉक्टरांना कधीच पाठीशी घालणार नाही.

ते म्हणाले, आजच्या परिस्थितीत सर्वच क्षेत्रात गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.त्यामुळे ताणतणाव वाढून कम्री वयात मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्तदाब वाढीला लागलेले आहेत. त्यामुळे या ताण-तणावापासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रत्येकाने स्वतःपासून सुरूवात करावी. रोज किमान
चार ते पाच कि.मी.व्यायाम आहे. आपण जीवनशैली बदल्लेली पाहिजे, त्याचबरोबर समतोल आहार, वेळेचे योग्य नियोजन, पुरेशी झोप यामुळे आपली
जगण्याची शैली बदलून ताणतणाव कमी होण्यास मदत होईल.

प्रास्ताविक घनश्याम आवटे यांनी केले.या कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब पाटील, माया पाटील, डॉ. प्रभाकर पाटील,साईनाथ पाटील, डॉ. चंद्रकांत धस, डॉ.प्रदीप काकडे, डॉ. अरूण पाटील, लॅबोरेटरी चालक आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप शेळके यांनी, तर आभार ला.सुनील कवठेकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *