शिराळा मेडिकल असोसिएशनचे स्नेहसंम्मेलन
शिराळा (प्रतिनिधी) शिराळा’ मेडिकल असोसिएशनचे स्नेहसंम्मेलन केमिस्ट भवन येथे झाले.
स्वागत गीत शरयू जाधव हिने सादर केले. डॉ. नितीन जाधव यांनी. ओंकार स्वरूपा, रात्रीस खेळ चाले ही गीते सादर केली तर प्रभाकर पाटील यांनी मनाच्या धुंदीत ये ना, सोनिका काकडे हीने कंदिलाची लग्नपत्रीका, विराज काकडे व प्रतिक पाटील यांनी वक्तृत्व स्पर्धा, तनाज मुल्ला, ऋतुराज पाटील, तेजस्विनी जाधव यांनी नृत्ये सादर केली.डॉ. प्रदीप काकडे यांनी हिमोग्लोबीन
कविता सादर केली. स्वागत डॉ. कृष्णा जाधव तर दिपप्रज्वलन डॉ.एम.एन.मुल्ला यांनी केले. यावेळी डॉ.एस.वाय.कुरणे, डॉ. उमेश काकडे, डॉ. साईनाथ पाटील, डॉ. अरूण पाटील, डॉ. आबासो पाटील, डॉ. अजय काळे डॉ.बी.बी. माने, वैशाली काकडे उपस्थित होते. आभार डॉ. प्रदीप काकडे यांनी मानले.
दैनिक पुढारी, २६ जानेवारी २००७,