शिराळा मेडिकल असो. च्या सी. एम.ई. कार्यक्रमास प्रतिसाद

शिराळा मेडिकल असो. च्या सी. एम.ई. कार्यक्रमास प्रतिसाद

शिराळा मेडीकल असोसिएशन व इपका लॅबोरेटरीज यांच्या संयुक्त विद्यमाने सी.एम.ई २००७ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
शिराळा तालुक्यातील भाटशिरगाव येथील लायन्स क्लब हॉल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरूवात शरयू नितीन जाधव हिच्या स्वागतगीताने करण्यात आली. दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजन अध्यक्षा सौ. डॉ. कृष्णा जाधव, उपाध्यक्ष डॉ. प्रदीप काकडे, सचिव सौ. डॉ. क्षमा पाटील, डॉ. प्रभाकर पाटील.
डॉ. धनंजय चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.जाधव यांनी गतवर्षात असोसिएशनच्यावतीने राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची व प्रबोधनात्मक कार्यक्रमांची माहिती दिली. स्त्रीभ्रूण हत्या हा एक गंभीर सामाजिक प्रश्न असल्याने त्यासाठी समाज व डॉक्टर मंडळींनी एकत्रितपणे काम करावे. दुरावत चाललेले रूग्ण व डॉक्टरांचे संबंध डॉक्टरांच्या जीवनात येणारा तणाव.
समस्या, नवनवीन उपचार पद्धती त्यासाठी डॉक्टरांना सी.एम.ई.सारखे उपक्रम राबवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी डॉ. संजय पाटील यांना इंटरनॅशनल बायोग्राफीकल सेंटर केंब्रीज (इंग्लंड) यांनी हेल्थ प्रोफेशनल ऑफ द इअर हा पुरस्कार दिला.
याबद्दल त्यांचा सत्कार सांगलीचे बालरोग तज्ज्ञ डॉ. शरद घाटगे यांच्याहस्ते करण्यात आला. त्यानंतर डॉ. शरद घाटगे यांनी मार्गदर्शन केले. कराडच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.प्रीती देशपांडे यांनी स्त्रियांमध्ये होणारे वयानुसार बदल, आजार त्यावर उपाय याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. धनंजय चव्हाण यांनी त्वचारोगाविषयी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *