शिराळा / प्रतिनिधी
येथील विश्वास नाईक शिराळा शहरातील यशस्वी महाविद्यालयातर्फे सर्व स्तरातील महिलांना सन्मानचिन्ह, शुभेच्छा पत्र देवून सन्मानित करण्यात आले.
यामध्ये प्राचार्य सौ. उज्वला पाटील, सौ. शारदादेवी नाईक, सौ. वैशाली नाईक, सौ. रेणुकादेवी देशमुख, तहसीलदार सौ.मोसमी बर्डे, डॉ.कृष्णा जाधव, अॅड.नेहा सूर्यवंशी, शालन आलेकर, यांच्या सत्काराबरोबर ग्रामीण स.महिला कर्मचारी, महिला एस.टी.वाहक, ग्रामपंचायत महिला कर्मचारी, महिला बचतगट, भाजी विक्रेत्या आदी महिलांचा सत्कार करण्यात आला.
संयोजन प्रा. सम्राटसिंह शिंदे, प्रा. संजय झुंबाडे, आर.एस.कदम, विद्यापीठ प्रतिनिधी अविनाश कदम, रणजित आवेकर, विजय थोरबोले, गणेश शिंदे यांनी सहभाग घेतला. कोकरूड (ता. शिराळा) पोलीस स्टेनशनमध्ये पोलीस स्टेशनचा सर्व कारभार महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातात होता. ठाणे अंमलदार, तपास, पुढील कार्यवाही, हातात देण्यात आल्याचे पो. निरीक्षक शशिकांत पाटोळे यांनी येथे माहिती दिली.