शिराळ्यात हुतात्मा सन्मान मोटारसायकल रॅली
> सकाळ वृत्तसेवा
शिराळा, ता. ९ : ९ ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त शिराळा पंचायत समिती येथील हुतात्मा स्तंभाला अभिवादन करून शिराळा ते मणदूर या हुतात्मा सन्मान मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीचे आयोजन ऑगस्ट क्रांतिदिन नियोजन समिती व शिवशंभू प्रतिष्ठान शिराळा यांच्या वतीने करण्यात आले. ही रॅली शिराळा, सागाव, फुफिरे फाटा, मांगरूळ स्मारक, बिळाशी स्मारक, कोकरूड, शेडगेवाडी, चरण, आरळा स्मारक, सोनवडे अशी जाऊन मणदूर येथील स्मारकाजवळ रॅलीची सांगता झाली.
या वेळी या रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. शिराळा येथील हुतात्मा स्तंभ अभिवादन प्रसंगी प्रा. विजयकुमार जोखे, कैलास देसाई, मारुती रोकडे, सम्राट शिंदे, डॉ. कृष्णा जाधव, निवासी नायब तहसीलदार हसन मुलाणी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील, अधीक्षक बी. आर. पाटील, उपअभियंता प्रवीण तेली अनिता पाटील, पूनम रोकडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.