शिराळा / प्रतिनिधी
महाराष्ट्र संतांची व लढवय्यांचीभूमी आहे. वारकरी संप्रदायातनामदेवांचे स्थान अनन्यसाधारणआहे. वारकरी संप्रदायाला नामदेवांनी तत्वज्ञाची बैठक दिली, असे
प्रतिपादन प्रा. शामसुंदर मिरजकर यांनी केले. अंधश्रद्धा निर्मुलन समिती वसमाजवादी प्रबोधिनी संत गाडगे महाराज सह पतसस्था याच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संत व्याख्यानमालेत संत नामदेवांचे वारकरी संप्रदायाला योगदान या विषयावर प्रा. मिरजकर बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. सौ. कृष्णा जाधव
होत्या.
अंधश्रद्धा निर्मुलन समिती व समाजवादी प्रबोधिनी संत गाडगे महाराज सह पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संत व्याख्यानमालेत संत वारकरी संप्रदायाला योगदान या विषयावर प्रा. मिरजकर बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. सौ. कृष्णा जाधव होत्या.नामदेवांचे मिरजकर म्हणाले, महाराष्ट्राची संस्कृती संत, कुणबी, कुळवाडी, कष्टकरी यांनी निर्माण केली. संस्कृती जडणघडणीत यांचा वाटा मोठा आहे. विठ्ठल महाराष्ट्राचे दैवत आहे. वारकरी संप्रदाय महाराष्ट्र व उत्तर भारतात नेण्याचे कार्य नामदेवांनी केले. कबिरांच्या विचारांची बैठक नामदेवांमुळे मिळाली.. नामदेवांनी मूर्तीपूजा, कर्मकांड,बुवाबाजी व अनिष्ठ प्रथांना विरोध केला. त्यांनी संप्रदायाला आचार धर्म दिला. अंतरंगात बदल हवा ही भूमिका संत नामदेवांनी घेतली होती.
अध्यक्षपदावरून बोलताना डॉ.जाधव म्हणाल्या, संतांनी समाजात शुद्धीकरणाची मोहिम घेतली.संतसाहित्य नामस्मरण भजन पूजन यासाठी नाही तर आत्मोद्धारासाठी आहे. प्रारंभी प्रास्ताविक प्रियांका पाटील, परिचय प्रियांका सवाईराम,सूत्रसंचालन रणजीत आष्टेकर आभार गणेश साळवी यांनी मानले.
यावेळी अन्य मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले.