समाज-डॉक्टरांनी एकत्र येण्याची गरज

समाज-डॉक्टरांनी एकत्र येण्याची गरज
डॉ. जाधव यांचे मत

शिराळा, दि. २५ (वार्ताहर) स्त्रीभ्रूण हत्या हा एक गंभीर सामाजिक प्रश्न असून, त्यासाठी समाज व डॉक्टरांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. डॉक्टरांच्या जीवनात येणारा ताण, समस्या, नवनवीन उपचार पद्धती यासाठी सीएमईसारखे उपक्रम राबविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिराळा तालुका मेडिकल असोसिएशन अध्यक्षा डॉ. सौ. कृष्णा जाधव यांनी केले. भाटशिरगाव (ता. शिरगाव) येथे मेडिकल असोसिएशन व इपका लॅबोरेटरीज यांच्या विद्यमाने आयोजित ‘सीएमई-२००७’ कार्यक्रमावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी डॉ. संजय पाटील यांना ‘इंटरनॅशनल बायोग्राफीकल सेंटर केंब्रिज (इंग्लंड) यांचा ‘हेल्थ प्रोफेशनल ऑफ द इयर’ हा पुरस्कार दिल्याबद्दल त्यांचा डॉ. शरद घाटगे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. घाटगे यांनी लहान मुलांना येणारी आकडी, त्यांचे वेगवेगळे आजार, औषधोपचार, कराडच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सौ. प्रीती देशपांडे यांनी स्त्रियांमधील होणारे वयानुरूप बदल, आजार, त्यांचे निदान व उपचारपद्धती, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. धनंजय चव्हाण यांनी मुरूमे, व्रण, चामखीळ, अनावश्यक केस यांवरील प्राथमिक उपचार, लेसर उपचार, क्रायोसर्जरी यांचे मार्गदर्शन संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप काकडे, सचिव डॉ. सौ. क्षमा पाटील, डॉ. ए. जी कुलकर्णी, डॉ. एस. वाय. कुरणे, प्रमोद कुकडे, डॉ. अरुण पाटील, डॉ. आबासाहेब पाटील, डॉ. अजय काळे, डॉ. राजाराम पाटील व १२५ डॉक्टर्स सहकुटुंब उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सौ. जयंती पाटील, डॉ. प्रकाश पाटील यांनी केले. आभार डॉ. प्रदीप काकडे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *