सांगली : प्रतिनिधी
‘मेरे देशप्रेमियो… आपस में प्रेमकरो…मेरे देश प्रेमियो…’ असा स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रप्रेमाचा देणाऱ्या देशभक्तीपर संदेश गाण्याच्या जरा याद करो
कार्यक्रमास कुर्बानी…’ सांगलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नऊ ऑगस्ट क्रांती दिनाला ७४ या वर्षे, “तर १५ आगस्ट स्वातंत्र्यदिनाला ७० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त भारतीय जनता पक्षाने राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सांगलीत आमदार सुधीर गाडगीळ यांनी पुढाकार स्वातंत्र्यदिनानिमित्त ‘याद करो कुर्बानी…’ हा देशभक्तीपर गाण्याचा
घेऊंन अविस्मरणीय कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी भाजपचे नेतेआमदार गाडगीळ, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, श्रीकांत शिंदे, मुन्ना कुरणे, प्रकाश बिरजे, नगरसेविका स्वरदा केळकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले.
धन्वंतरी’चे ‘स्वर कार्यक्रमांतर्गत डॉक्टर गायक कलाकारांनी अनेक देशभक्तीपर गाणी सादर करून रसिकांना स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला संगीताची मेजवानीच दिली. गायक कलाकार डॉ. चिदानंद चिवटे, डॉ. अनिता नातू, डॉ. नितीन जाधव, डॉ. स्नेहा शर्मा, सौरभ चिवटे यांनी हिंदीमराठी चित्रपटातील देशभक्तीपरगाणी सादर करून मंत्रमुग्ध केले. ‘ये मेरे वतन के लोगो’, ‘मेरे देश. प्रेमियो…’, ‘कसमे वादे प्यार वफा’, ‘हे राष्ट्र देवतांचे’; ‘उषःकाल होता…’ अशा अनेक देशप्रेमांनी भारलेली गाणी सादर केली. यांना अविनाश इनामदार (सिंथेसायझर), चंद्रकांत जाधव (ढोलक), सुशील बनसोडे (गिटार), किरण ठाणेदार (ऑक्टोपॅड), अजय भोगले (तबला) यांनी साथसंगत केली.