ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी यांचे मार्फत अजय इंटरनॅशनल स्कूल रेड येथे जायंट्स च्या उपाध्यक्ष डॉ. सौ. कृष्णा जाधव यांनी गुड टच- बॅड टच या विषयी मुले व मुली यांना मार्गदर्शन केले.
डॉ. जाधव मॅडम यांनी चांगल्या आणि वाईट हेतूने केलेला स्पर्श जाणवत असतो. त्यास वेळीच प्रतिउत्तर दिले पाहिजे. लहान मुलं मुली पासून अगदी वयस्कर महिलांना सुद्धा वाईट स्पर्शाचा अनुभव येत असतो व त्यांचा त्रास होत असतो. याविषयी सर्वांनी सजग राहिले पाहिजे. न घाबरता बोलले पाहिजे सावध राहून वाईट प्रवृत्तीला आळा घातला पाहिजे असे सांगितले. ऍड नेहा सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती दिली. सदर कार्यक्रमावेळी जायंट्स ग्रुप च्या अध्यक्ष सरोजिनी कदम,डॉ. मनिषायादव,उपाध्यक्ष प्रज्ञा चरनकर,कार्यवाह रेश्मा पवार, सदस्य छाया नलावडे,अजय इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य विद्याधर डोईजड,सर्वं शिक्षक-शिक्षिका उपस्थित होत्या.
प्रारंभी सिद्धी डांगे या विद्यार्थ्यांनीने सावित्रीबाई फुले यांचा जीवनप्रवास उलगडला, सौ.एस. जे. मॅडम व राजवीर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तर शाळेतील विद्यार्थ्यांनि आभार मानले.