अभिप्राय

विनायक महादेव गायकवाड

Mar 11, 2024

सोमवार दि.११/03/२०२४ पेशेर नाव: श्री महादेव दत्तू गायकवाड रा. शिराळा अभिप्राय: श्री. विनायक महादेव गायकवाड सन्मानीय डॉ. नितीन जाधव (सर) हे आमचे फैमली डॉक्टर आहेत. तसेच डॉ· सो कृष्णा जाधव मॅडम हे दाम्पत्य म्हणजे शिराळा तालुक्याच्या वैद्यकीय क्षेत्राला लाभलेले एक वरदान आहे असेच म्हणावे लागेल कारण इथे वेळेत येणारा पेशंट नक्कीच बरा होतो. गेली १२ वर्षापासून मी माझ्या आईवडीलांची ट्रिटमेंट आनंद हॉस्पिटल मध्ये घेत आहे. तेव्हापासून आज पर्यंत रात्री अपरात्री केव्हाही हे दांम्पत्य उपचारासाठी उपलब्ध असतात. अगदी कोरोना काळात देखील त्यांनी माझ्या कुटुंबाविषयी दाखवलेले प्रेम आणि दिलेली वैद्यकीय सेवा याचे वर्णन करण्यासाठी शब्दच नाहीत. इतक्या चांगल्या प्रकारे यांनी सर्वांना मदत केली आहे. शेवटी डॉक्टर म्हणजे माणूस आहे १००% सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात नसतात. अपवादात्मक परिस्थिती मध्ये दुर्घटना घडू शकते मात्र त्यास डॉक्टर जबाबदार असतातच असे नाही. मात्र आजवर मला आलेला अनुभव पाहता डॉक्टर दांम्पत्य आणि इथे काम करणारा स्टाफ पेशंट बरा व्हावा म्हणूनच त्यांचे कर्तव्य पार पाडत असतो. यापुढील काळात आनंद हॉस्पिटल कडून जास्तीत जास्त चांगली रुग्ण सेवा घडो यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना-- भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा कळावे आपला स्नेहांकीत विनायक म.. गायकवाड शिराळा जि. सांगली

बड़ेसो मोहिद्दीनसो पिरजादे

Mar 4, 2024

अभिप्राय - दि. ४/3/20२४ नमस्कार आदरणीय वैदयजी मी बड़ेसो मोहिद्दीनसो पिरजादे मु. फाकिरवाडी, पोस्ट इंगुळ, तालुका शिराळा, जिल्हा सांगली पिनकोड ४१५४०८ महाराष्ट्र दि. १/३/२०२४ रोजी सकाळी लवकर ७.०० वाजता फिट व हृदयरोग झटका, मेंदुतील रक्ताच्या चरबीच्या गाठी अशा एकूण जबरदस्त आजाराने ग्रस्त माझी आई हबाबी मोहिद्दीनसो पिरजादे, हिला घेऊन मी दवाखान्यामध्ये दाखल झालो. त्यानंतर डॉक्टरांनी वेगवेगळ्या चाचण्या करून आधुनिक नवनवीन औषधे व तंत्रज्ञान वापरून माझ्या आईला मोठ्या आजारातून १००% बरे केल्यामुळे मी डॉक्टरांचा शतशः आभारी आहे डॉक्टरांनी उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा देऊन रुग्णांना चांगले करावे. डॉक्टरांच्या भावी वाटचाली बद्दल मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. बड़ेसो मोहिदीनसा पिरजादे

सौ. लक्ष्मी सचिन नांगरे

Mar 1, 2024

मी लक्ष्मी सचिन नांगरे कोकरूड आपल्या हॉस्पीटलची चर्चा खुप होते. तसेच सर्व स्टाफचे आणि डॉक्टरचे आभार मानतो. मी दि 01/03/2024 रोजी ऍडमिट झालो होतो त्याआधी मी कोकरूड मध्ये डॉक्टरकडे दाखवले होते त्यांनी आम्हाला आनंद हॉस्पिटलाचा पता दिला त्यानंतर आम्ही 01/03/2024 रोजी सकाळी 8.00 ला आनंद हॉस्पीटल शिराळा येथे आलो त्यावेळी माझी परिस्थीत क्रिटिकल होती. पण आनंद हॉस्पीटल मध्ये आल्यानंतर जाधव मॅडमांनी मला लगेच निदान समजून सांगितले व ताबडतोड ऑपरेशनची तयारी केली अगदी कमी वेळेत करून आम्हाला आनंदाचा धक्का दिला खरच आनंद हास्पीटल मधील सर्वच स्टाफचा खुप आभारी आहे. आपले सहकार्य असेच राहो. ही विनंती तसेच दवाखान्याची स्वच्छता खुप सुंदर आहे. पुनश्च एकदा सर्व स्टाफ, आपण मॅडम यांचे शतशः आभार. आपली विश्वासु सौ. लक्ष्मी सचिन नांगरे कोकरूड

राहुल संजय गुरव

Feb 19, 2024

मी राहुल संजय गुख रा. तडवळे. आपल्या हॉस्पीटल चे नाव ऐकून खूप होतो. माझ्या आज्जी ची तब्बेत अचानक बिघडली होती, आम्ही ठरवल आपल्याकडे दाखवून ऍडमिट करायची. ऍडमिट केल्यानंतर लगेचच आज्जी च्या तब्वेतीत सुधारण जाणवून आली. डॉक्टर सरांनी खूप चांगली औषधे देऊन तपासण्या करून घेतल्या, तसेच सरांनी सगळ्यांना आत्मविश्वास दिला, मी विशेष करून साभार मानल उमेश साहेब आणि सुधा मॅडम चे, त्यांनी प्रत्येक वेळेस आम्हाला मदत केली., रात्री-अपरात्री जेव्हा गरज असेल तेव्हा. परत एकदा डॉक्टर सर आणि सर्व स्टाफ चे आभार आपला विश्वासू राहुल संजय गुरव

सौ. संगिता राजेंद्र साळुंखे

Feb 19, 2024

मी संगिता राजेंद्र साळुंखे रा. शिराळा (मुळ निगडी) आपल्या हॉस्पीटलची चर्चा खुप होते. आमच्या निगडी गावात मी स्वतः बचत गटांचे काम करते त्यामुळे निगडी गावामध्येतर आपण डॉक्टर साहेब त्यांचा देवच आहात कारण खुप लोक आपणाला मानतात. पण जेव्हा माझ्या मुलाला आशिषला आपल्या हॉस्पीटल मधे उपचारासाठी आणले. दि. 14-2-2024 रोजी मी सायंकाळी ५.३० वाजता त्याला घेऊन आले. आणि आपण त्याला तपासून जे शब्द बोललात त्या शब्दांचा खुप आधार वाटला. कारण जे आपले बोलणे स्पष्ट आहे ते खुप चांगले आहे आपण कोणाची खोटे बोलून दिशाभूल करत नाही. आणि आधाराचे शब्द बोलना ते ऐकुण खरोखर अर्धा आजार आणि आम्हाला पेशेट बद्दल जी मनात भिती बसलेली असते ती दूर होते व धीर येतो. खरंच साहेब मी ५० वर्षात अशी देवमाणसे बघीतली नाही. आपण व आपल्या मॅडम खरोखर देवच आहात. कारण मी तरी म्हणने मॅडमचा तर पुर्नजन्म झालेला आहे. कारण परमेश्वरांने त्यांना गोरगरिब जनतेची सेवा करणासाठी त्यांचा पुनर्जन्म झाला. मी नेहमी मॅडमचे उदाहरण देत असते. परमेश्वर आहे. आणि आपण दोघंही एक उदाहरण आहात. तसेच सर आपला सर्वच स्टाफ खूप चांगला आहे. आपल्या हॉस्पीटल मधे मी ५ दिवस राहीले पण मला जरा सुद्धा वाटले नाही कि हॉस्पीटल मधे आहे. कारण घरच्या सारखे वातावरण- तसेच सर्व स्टाफची शिस्त खुप छान आहे. आपुलकीचे नाते निर्मााण करणारे हॉस्पीटल म्हणावेसे वाटते. खर तर खुप ठिकाणी पाहीले डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी जाताना लोक हॉस्पीटलकडे बघताना परक्या सारखे बघतात पण आपल्या आनंद हॉस्पीटलकडे लोक समाधानाने व आनंदाने बघतात. कारण आपल्या हॉस्पीटलचे नाव सुद्धा आनंद हॉस्पीटल का ठेवले असेल त्याचे उत्तर आपोआप मिळते. सर मी खुप खुश आहे माझा मुलगा चांगला झाला आपण 14-2. 2024 19-2-2024 पर्यंत जी सेवा दिली, उपचार केले. त्याबद्दल आपले, आपल्या स्टाफचे खुप खुप आभार. विशेष करून संध्याकाळचे जे उमेश दादा. आहेत व बिऊर च्या मावशी खुपच पेशंटची काळजी घेतात. सर आपल्या हॉस्पीटल व आपल्या बद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. पुनश्य एकदा सर्व स्टाफ, आपण, मॅडम यांचे शतश: आभार. आपली विश्वासू सौ. संगिता राजेंद्र साळुंखे

स्वाती जाधव

Feb 6, 2024

नमस्कार मी स्वाती जाधव रा. कापरी दि :- 06/02/2024 रोजी मी या दवाखान्यात आले. माझ्या मिस्टरची तब्येत खराब होती त्यांना गेले ६ महिने खोकला आहे. त्यामुळे आम्हाला आनंद हॉस्पीटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. आम्ही येथे आलो डॉक्टर नितिन जाधव (सर) यांनी माझ्या मिस्टरनवर उपचार करून त्यांची प्रकृतीत चांगली सुधारना होत आहे येथील डॉक्टर व स्टॉफचे मी आभार मानतो. स्वाती जाधव रा. कापरी