शिराळा येथे पर्यावरण दिनानिमित्त रोपे वाटप
प्रतिनिधी – शिराळा
अंबामाता मंदिर शिराळा येथे पर्यावरण दिनानिमित्त महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) यांच्या संकल्पनेतून उपक्रम राबवण्यात आला. महिलांना आंब्याची रोपे वाटप करण्यात आली. या झाडांचे जतन व संगोपन चांगल्या पद्धतीने करणाऱ्या महिलांना बक्षीस देण्यात येणार आहे.
आपला बझार उद्योग समूहच्या अध्यक्ष सौ. सुनितादेवी नाईक प्रमुख उपस्थित होत्या. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण केले जाते. परंतु त्याचे जतन प्रामाणिकपणे होतेच असे नाही. सदर झाडांचे जतन व संवर्धन करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संवर्धन करण्यात महिला आघाडीने घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे असे नाईक
म्हणाल्या.
तालुकाध्यक्ष साधना पाटील, प्रतिभा पवार, शुभांगी देसाई, अर्चना कदम, डॉ कृष्णा जाधव, अॅड. नेहा सुर्यवंशी, जयश्री पाटील, करुणा मोहिते, कल्पना गायकवाड, वैशाली
कदम, रूपा लायकर, स्वाती कोरडे, ज्योती गुरव, शैलजा काकडे, मनीषा हसबनीस, अर्चना शेटे, डॉ वैशाली यादव, नीता जोखे, अभिलाषा नलवडे, स्मिता महिंद, डॉ मनीषा
यादव, पूजा पाटील, कोमल कवठेकर, मंगल पाटील, आशा पाटील, मनीषा नाझरे, नंदिनी शिंदे, रेखा दाभाडे, शिराळा शहर व. तालुक्यातील महिला उपस्थित होत्या.