14 मार्च शनिवारी कै.श्री. काकासाहेब चितळे यांच्या जयंतीनिमित्त जायंट्स ग्रुप ऑफ शिराळा हिरकणी आणि ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय शिराळा यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा लाभ 145 रुग्णांना झाला. शिबिरादरम्यान 35 रुग्णांना नेत्र शस्त्रक्रियेसाठी सांगली येथे पाठविण्यात आले. शस्त्रक्रियेसाठी सुदर्शन आय हॉस्पिटल सांगली यांचे सौजन्य लाभले. याप्रसंगी नेत्रचिकित्सा अधिकारी सविता नलावडे जायंट्सच्या अध्यक्षा प्रज्ञा चरणकर, कार्यवाह रेशमा पवार, पी. आर. ओ. डॉ. कृष्णा जाधव, सदस्या मीना इंगळे उपस्थित होत्या
नेत्र तपासणी शिबिर
