डांगे वैद्यक महाविद्यालयात बेसीक मेथोडोलॉजी वर्कशाप

डांगे वैद्यक महाविद्यालयात बेसीक मेथोडोलॉजी वर्कशाप
आष्टा / प्रतिनिधी
येथील अण्णासाहेब डांगे आयुर्वेद वैद्यक महाविद्यालय, पदव्युत्तर संशोधन केंद्र येथे गुरुवार दि. ३ ते शनिवार दि. ५ ऑगस्ट २०२३ या कालावधीत तीन दिवसीय बेसिक रिसर्च मेथोडोलॉजी वर्कशॉप घेण्यात आले. सदर वर्कशॉपसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रिसर्च विभागातर्फे मान्यता प्राप्त झाली होती. सदर वर्कशॉपमध्ये महाविद्यालयातील अध्यापक तसेच परिसरातील नामांकित आयुर्वेद, अॅलोपॅथी, डेंटल, होमिओपॅथी, नर्सिंग महाविद्यालयातील पदव्युत्तर विद्यार्थी, पीएचडी स्कॉलर्स व अध्यापक मिळून ५० जणांनी वर्कशॉपमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक -अध्यक्ष डॉ.अण्णासाहेब डांगे, सचिव चिमण डांगे, कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई यांच्या प्रेरणेने हा वर्कशॉप घेण्यात आला.
आष्टा : डांगे वैद्यक महाविद्यालयात तीन दिवसीय बेसिक रिसर्च मेथोडोलॉजी वर्कशॉपप्रसंगी उपस्थित पदाधिकारी.
संशोधन कार्यासाठी उपयुक्त या वर्कशॉपसाठी डायरेक्टर डॉ. एआरव्ही मूर्ति, प्राचार्य डॉ. अमित पेठकर, प्रशासकीय अधिकारी डॉ. विजय डांगे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
रिसर्च विभाग प्रमुख डॉ. अंजली उपाध्ये, अधिव्याख्याता अक्षय चौगुले यांनी संयोजन केले. वर्कशॉपच्या माध्यमातून विद्यापीठाच्या रिसर्च डेटाबेस मान्यताप्राप्त महाविद्यालयातील
२० तज्ज्ञ अध्यापकांनी मार्गदर्शन करून योगदान केले. यामध्ये प्राचार्य डॉ. अमित पेठकर, डॉ. महेश इनामदार, डॉ.पराग देशमुखे, डॉ. सुजाता काटे, डॉ. जयवंत खरात, डॉ. वेदश्री कलवडे, डॉ. स्मिता लोखंडे, डॉ.दत्तात्रय निकम, डॉ. अर्चना वाडकर, डॉ.सुनील चव्हाण, डॉ. वर्षा खोत, डॉ. रूपाली पाटील, डॉ. अंजली उपाध्ये, डॉ. सुभाष पत्की, डॉ. शंकर माने, डॉ. टिंकूगणेश खलचे, डॉ. शीतल माने, अक्षय चौगुले यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *