कर्तृत्ववान स्त्रीशक्तिला मानाचा मुजरा

कर्तृत्ववान स्त्रीशक्तिला मानाचा मुजरा
मधुरा बाचल यांचे गौरवोद्गार; कोल्हापुरात ‘सकाळ वूमन इन्फ्ल्यूएन्सर’ पुरस्कार
काळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. ११ : कौटुंबिक जबाबदाऱ्या, व्यावसायिक आव्हाने अशा असंख्य अडथळ्यांवर मात करून महिलांनी सर्वच क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध केले. ‘सकाळ’ने अशा गुणवंत महिलांचा सन्मान करून यांना प्रोत्साहित केले आहे. अशा सर्वच कर्तृत्ववान स्त्रीशक्तीला मानाचा मुजरा, असे गौरवोद्गार मधुरा बाचल यांनी काढले. त्यांच्या हस्ते आज ‘सकाळ’च्या ‘वूमन न्फ्ल्यूएन्सर अवॉर्ड’चे वितरण करण्यात आले. मधुरा बाचल या मधुराज रेसीपी’ हे प्रसिद्ध यूट्यूब चॅनल चालवतात. सांगली, रत्नागिरी, सिंधूदुर्ग या जिल्ह्यांतील कर्तृत्ववान महिलांचा यावेळी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
सुरुवातीला ऋद्रम बँडच्या शुभम साळोखे आणि रोहीत सुतार यांनी गिटार आणि ड्रमच्या साथीने बहारदार गाणी सादर केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘सकाळ’चे संपादक-संचालक श्रीराम पवार यांनी कले. यावेळी ते म्हणाले, “सकाळ माध्यम समूहाने पहिल्यापासूनच बातमीदारीच्या पलीकडील आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली आहे. समाजात जे चांगले आहे ते वाचावे आणि लोकांसमोर मांडावे. याच भावनेतून या पुरस्कारांचे आयोजन केले आहे. ‘सकाळ’ फंडाची सुरुवातही सामाजिक त्तरदायित्वातून झाली. या फंडाच्या शाळा सुरू करून माणूस जोडण्याचे काम ‘सकाळ’ने केले. ‘पंचगंगा वाचवूया’ या अभियानात हजारो नागरिकांना सहभागी करून नदी प्रदूषणमुक्त करण्याची लोकचळवळ ‘सकाळ’ने सुरू केली. पुणे, नागपूर, नाशिक येथे अशीच लोकचळवळ नदी वाचवण्यासाठी सुरू करणार आहोत.
‘सकाळ वूमन इन्फ्ल्यूएन्सर’ अवॉर्डसाठी आपली निवड करताना काही निकष लावण्यात आले. त्यातून तुमची निवड केली गेली यामुळे आपले कर्तृत्व सिद्ध झाले आहे. या कर्तृत्वाचा हा सन्मान आहे.”
मधुरा बाचल म्हणाल्या, “संवेदनशीलता हा महिलांचा एक गुण आहे. यामुळे त्या कल्पक असतात. कुटुंबाचे पालन पोषण असो किंवा एखादा व्यवसाय असो समोर येणाऱ्या प्रत्येक संकटावर त्या मात करतात. अशा संकटांना मागे टाकून व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध केलेल्या या स्त्रीशक्तीला माझा मानाचा मुजरा. ‘सकाळ’ने नेहमीच महिलांच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबवले. त्याचा महिलांना मोठ्या प्रमाणात उपयोग झाला. मी ‘सकाळ’ची लहानपणापासूनची वाचक आहे.
‘महाराष्ट्रीयन पदार्थ चविष्ट आणि पौष्टिक आहेत. त्यामुळेच ते आवडीने खाल्ले जातात. या मराठी पदार्थांना जगभर पोहोचवण्याच्या उद्देशाने हे यूट्यूब चॅनेल सुरू केले. सुरुवातीला
कॅमेऱ्याची सवय नसल्याने मनात धाकधूक होती. कालांतराने याची सवय झाली. आज मधुराज रेसिपी हे चॅनेल सर्वत्र पाहिले जाते.”
प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार म्हणाल्या, “समाजात विविध वांदळांनी आपकी पुरस्कारामुळे या महिलांना पुढचे पाऊल टाकण्याचे बळ मिळणार आहे. हा हा गुणगौरव सोहळा
कायमस्वरूपी सर्वांच्या लक्षात राहील.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या बेहेरे यांनी केले. ‘सकाळ’च्या सांगली आवृत्तीचे सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी आभार मानले.

कोल्हापूर : ‘सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र’अंतर्गत सांगली जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा वूमन इन्फ्लुएन्सर अवॉर्डने बुधवारी गौरव करण्यात आला. त्यावेळी प्रमुख पाहुण्या मधुरा बाचल यांच्यासमवेत गौरवमूर्ती.

सांगली जिल्ह्यातील पुरस्कारार्थी
डॉ. सुनीता शंकर माळी (उपप्राचार्य, कन्या महाविद्यालय, मिरज), स्नेहल संदीप खरे (गायत्री केटरिंग सर्व्हिसेस, मिरज), दीपा सुभाषचंद्र पाटील (संचालिका, श्री. निलंबिका बसवेश्वर शिक्षण संस्था, संख, जत), मंगल रावसाहेब पाटील (सरपंच, ग्रामपंचायत, संख), सज्जला तुषार मोरे (प्राचार्य, शाहू प्राथमिक विद्यामंदिर, विटा), ज्योती अरविंद देवकर (कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, सांगली), संगीता संजीव काळे (संस्थापक ·संचालिका, स्कायवे हेअर अँड मेकअप अकादमी प्रा. लि.) मधुमता दयाधन सोनवणे (सामाजिक कार्यकर्त्या, मिरज), रिना महेश चव्हाण (सिल्हौट (आर्किडेकर) मा अभिनंदन पाटील (संस्थापक बिरंग य लाइफ कोचिंग) (संचालिका, चौगुले टूर अँड ट्रॅव्हल्स, इस्लामपूर (आनंद हॉस्पिटल, शिराळा), शर्मिष्ठा संजय इस्लामपूर), ज्योती महेश कांबळे (अंगणवा शिरोळ), मनीषा सचिन शितोळे (माजी नगरा शिला समीर गायकवाड-भासर (सामाजिक कार्य श्रीनिवास भोसले (आर्थिक कर सल्लागार), निंबाळकर (सचिव, डी. आर. नाईक-निंबाळ विटा), उमा दीपर सारडा (संचालिका, सारडा ब्रद ओसवाल (सामाजिक कार्यकर्त्या, इस्लामपूर), व्ही. क्रिएशन, सांगली), स्मिता चेतन माने (का विभाग कोल्हापर दक्षिण) निकिता संजीव पा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *