द शिराळा न्यूज, वृत्तसेवा
समाज आजची स्त्री हीघडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. विविध क्षेत्रात काम करत असताना अनेकजण समाजासाठी आपणाला काहीतरी केलं पाहिजे, या विचारांतून प्रत्येक महिला कार्य करीत असतात. त्यापैकी म्हणजे शिराळा येथे सुप्रसिध्द स्त्री रोग तज्ञ डॉ. सौ. कृष्णा नितीन जाधव. शिराळा येथील आनंद हॉस्पिटल या त्यांच्या स्वत:च्या हॉस्पिटलमधून त्यांनी अनेक महिलांच्यावर यशस्वी उपचार करून त्यांना अनेक व्याधींपासून बरे केलं आहे. यामध्ये त्यांना साथ मिळाली. ती त्यांचे पती सुप्रसिध्द एम. डी. डॉ. नितीन जाधव यांची. डॉ. कृष्णा जाधव यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील वाणेगाव येथे झाला. वडील डॉ. गंगाधर निकम व आई सौ. रेखा गंगाधर निकम हे दोघेही शिक्षक असल्याने घरामध्ये शैक्षणिक वातावरण चांगले होते. लहनपनापासुनच वैद्यकीय क्षेत्रात आपणाला काम करायचे आहे. असे स्वप्न डॉ. कृष्णा जाधव यांनी पाहिले होते. व त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी त्यांचे आई वडीलांनीही कोणतीच कसर बाकी ठेवली नाही. लग्ना अगोदर M.B.B.S. ची पदवी पूर्ण केली. १९९६ साली डॉ. नितीन जाधव यांच्याशी त्यांचा विवाह झाला. यावेळी डॉ. नितीन जाधव यांनी त्यांना पुढील वैद्यकीय शिक्षण पूर्ण करावे, यासाठी प्रोत्साहन दिले. व १९९९ ला डॉ. कृष्णा जाधव यांनी O.B.G.Y. M.D. स्त्री रोग तज्ञ ही वैद्यकीय क्षेत्रातील पदवी पूर्ण करून महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून त्यानी त्यांच्याच शिराळा येथील आनंद हॉस्पिटल मधून सेवा सुरू केली.
वैद्यकीय सेवा करत असताना त्यांना ग्रामीण भागातील महिलांच्या आरोग्याबाबतच्या अनेक समस्यां जाणवल्या. गरोदर महिलां आरोग्याच्या बाबतीत निष्काळजी होत्या. तर काहीं महिलांच्या अंगात रक्ताची कमतरता होती. मासिक पाळीमध्ये काळजी घेत नव्हत्या. व गैरसमज आदींबाबतच्या समस्या स्त्रीयांमध्ये असल्याच्या त्यांच्या निदर्शनास आल्या. यावेळी प्रथमत: महिलांना आपल्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून सक्षम बनवले पाहिजे. यासाठी त्यांनी महिलांना मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले. मासिक पाळी व गैरसमज, शरिरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी काय करावे? अंधश्रध्दा निर्मुलन आदींच्या बाबतीत त्यांनी महिलांच्यामध्ये जागृतीचे काम सुरू केले. ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालयांमध्ये जावून याबातचे मार्गदर्शन सुरू केले. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या महिलांनाही योग्य सल्ला देवून त्यांच्यावर चांगले उपचार केले. शिराळा तालुका हा ग्रामीण भागात मोडत आहे. शहरातील व आजूबाजूच्या खेडेगावातील अनेक महिला गरोदरपणात शहरामध्ये डिलीव्हरीसाठी येत असतात. परंतु डिलीव्हरीप्रसंगी त्यांच्या अंगात रक्ताचे प्रमाण नसल्याने अनेकवेळा रूग्णांना अनेक संकटांचा सामना करावा लागत असे. यावेळी बी. पी. वाढणे, शुगर वाढणे आदींच्या घटना घडत असतं. यावेळी डॉ. कृष्णा जाधव यांचे पती डॉ. नितीन जाधव यांचे त्यांना पूर्ण सहकार्य लाभत असे. इस्लामपूर, कराड सारख्या ठिकाणी रक्ताच्या पिशवी आणण्यासाठी वेळपप्रसंगी आणण्यासाठी जावे लागत असे. अती रक्तस्त्राव झाल्याने अनेक रुग्णांना त्रास व्हायच्या यावेळी रक्ताची पिशवी आणेपर्यत स्वत: रूग्णांजवळ थांबून रूग्णांची काळजी घेतली. स्त्री भ्रूण हत्या थांबावावी व स्त्री जन्माचे स्वागत करावे यासाठी अनेक महिलांमध्ये व पुरुषांमध्ये त्यांनी जनजागृती मोहिम सुरू केली. मुलगा व मुलगी असा भेदभाव न करता आजच्या मुली या मुलांपेक्षा कतीतरी पटीने चांगल्या आहेत. मुलगा हा वंशाचा दिवा असला तरी मुलगीही त्या दीव्याची वात आहे… मुलगा व मुलगी असा भेद करू नका यासाठी त्यांनी अनेकठिकाणी मार्गदर्शन केले. डॉ. कृष्णा जाधव व डॉ. नितीन जाधव यांनाही दोनच मुली आहेत. आज त्यांच्या मुलीही चांगले शिक्षण घेत आहेत. शरयू जाधव व शर्वरी जाधव या दोन मुली आज त्यांच्या क्षेत्रात आपल्या आई वडीलांचे नाव वाढवत वैद्यकीय सेवा करत असताना डॉ. कृष्णा जाधव यांना जुन्या अशा पितळ व तांब्यांच्या वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद आहे. देशातील व अनेक परदेशातील जुन्या व पारंपारिक पितळ व तांब्यांच्या वस्तूंचा संग्रह त्यांनी केला आहे. आजच्या पिढीला जुन्या वस्तूंची
माहिती नाही. जुन्या काळातील आपली संस्कृती व श्रीमंती कशी होती? पूर्वी प्रत्येक घरांमध्ये पितळ व तांबे या धातूंच्या वस्तू वापर केला जायचा. परंतु
आजच्या जमान्यात बहुतांशी घरांमध्ये स्टील व प्लास्टिक वस्तू वापरात आहेत. त्यामुळे आजच्या मुलांना तांब्याच्या व पितळेच्या वस्तू या पहायला मिळत नाहीत. परंतु डॉ. कृष्णा जाधव यांनी वैद्यकीय सेवा सांभाळत आपली आवडही त्यांनी जोपासली आहे. सध्या त्यांच्या संग्रहालयाध्ये आपणाला पितळ व तांबे यांच्या वस्तूंच्या अनेक जुन्या वस्तू पहायला मिळतील. यामध्ये जुनी घड्याळे, रेल्वेचा लालटेन, पितळी हत्ती, घोडे, विविध व आकर्षक डिझाईनचे पितळी पानडबे, उंटाची गाडी, सुकोई विमानाची प्रतिकृती, जुनी भांडी, तांब्याची मोठमोठी भांडी, कंदील आदींचा संग्रह आपणाला याठिकाणी पहायला मिळेल. डॉ. कृष्णा जाधव व डॉ. नितीन जाधव यांनी शिराळामध्ये १० गुंठे जागेमध्ये स्वतःचे असे जंगल तयार केले आहे. झाडे लावा झाडे जगवा… असा एकप्रकारे संदेश देण्याचे काम त्या उभयतांनी केले आहे. सध्या या जंगलामध्ये ६५० प्रकारची देशी झाडे, १५ प्रकारची फळझाडे, अनेकप्रकारची फुलझाडे आहेत. एक आदर्शवत जंगल आपणाला पहायला मिळेल. वाचनाचीही आवड असल्याने त्यांनी स्वत:चे असे ग्रंथालय तयार केले आहे. अनेक मान्यवर लेखकांची पुस्तके त्यांच्या ग्रंथालयामध्ये आहेत. या सर्व त्यांच्या सामाजीक कामाची दखल घेवून सकाळ आयडॉल्स महाराष्ट्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.