डॉक्टरांचं घर बनलं तांब्याचे वस्तूसंग्रहालय

डॉ. कृष्णा जाधव हे शिराळा येथे गेली २४ वर्षे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. त्यांनी लहानपणी आपल्या आजीच्या घरी तांब्याच्या वस्तू पहिल्या होत्या. त्या वेळेपासून त्यांना त्या वस्तूंचे आकर्षण होते. पुढे, शिक्षण घेत असताना त्याबद्दल त्यांना फारसे काही वाटले नाही. मात्र आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळत असताना व बाहेर फिरायला जात असताना जुन्या तांब्याच्या वस्तू पाहून त्यांना लहानपणी पाहिलेल्या तांब्याच्या वस्तूंचे पुन्हा आकर्षण वाटू लागले. एकविसाव्या शतकामध्ये स्टील व अॅल्युमिनियमची भांडी वापरत असताना तांब्याच्या जुन्या लुप्त होत चाललेल्या वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद त्यांना लागला. ज्या ठिकाणी जातील, तिथून जुन्या तांब्याच्या वस्तू खरेदी करण्यास सुरवात केली.
अनेक ठिकाणी मोडीत अथवा भंगारात घालण्यासाठी आणलेल्या वस्तू त्यांनी खरेदी केल्या आहेत. त्यांनी राजस्थान, कर्नाटक, काश्मीर, गोवा, सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका येथूनही वस्तू खरेदी केल्या आहेत. त्यांच्या वस्तू खरेदीचा प्रवास हा गावातील स्थानिक दुकानदार ते परदेश दौरा असा आहे. आजअखेर त्यांच्याकडे २०० च्या वर वस्तूंचा संग्रह आहे. यामध्ये कप-बशी, मोराचा टेबल लॅम्प, पेपरवेट, मंदिराचा कळस, मासा, हत्ती, मोर, चित्ता, उंट, जुनं ते सोनं ही प्रसिद्ध असली, तरी जुन्याला सोन्याची उपमा का दिली जाते, हा प्रश्न सर्वांना पडल्याशिवाय राहत नाही. याच भावनेतून एक छंद म्हणून जुन्या तांब्याच्या वस्तू गोळा करत-करत त्या वस्तूंचे घरी संग्रहालय कधी झाले, हेच डॉ. कृष्णा जाधव यांना समजले नाही.
मात्र हे घरचं संग्रहालय आजच्या व पुढच्या तरुणाईला दिशादर्शक असून जुन्या लोकांच्या स्मृतीला उजाळा देणारे आहे. शिवाजीराव चौगुले तांब्याचा घोडा सांबर, गरुड, साप, उंदीर, पोपट, विंचू, कोंबडा, माकड, बगळे, राजहंस, बेडूक, हरिण, पाल, विळी, जहाज, रेल्वे, विमान, घोडागाडी, उंटाचा रथ, तांब्याचे हंडे, चहाचे मोठे कप, पाण्याचा जग, पानपुडा, कोळशाची इस्त्री, पंखा, मोठा हंडा, कुलूप, दागिन्यांचा डबा, मेकअप डबा, अगरबत्ती स्टँड, गाळणी, किसणी, जिनीचे भांडे, चाळण, नाईट लॅम्प, जहाज लॅम्प, घुबड, धन्वंतरी मूर्ती, पेटारा, समई, आरतीचे ताट, अडकित्ता, वजन काटा व वजन मापे,
ग्लास, ताटे, परात, वाट्या आदींचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *