शिराळा मेडिकल संघटनेचे डॉ. कृष्णा जाधव अध्यक्ष
शिराळा, ता. ३
येथील मेडिकल संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. सौ. कृष्णा नितीन जाधव, उपाध्यक्षपदी डॉ. डॉ. कृष्णा जाधव डॉ. प्रदीप काकडे डॉ. क्षमा पाटील. प्रदीप वसंत काकडे यांची, तर सचिवपदी डॉ. सौ. क्षमा प्रभाकर पाटील यांची निवड झाली. संघटनेच्या सर्वसाधारण सभेत पदाधिकाऱ्यांनी निवड झाली.
नूतन अध्यक्षा सौ. जाधव म्हणाल्या, “पुढील वर्ष रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. २४ वर्षांत संघटनेने अनेक विधायक कामे केली आहेत. ग्रामीण व डोंगराळ भागामध्ये चांगल्या पद्धतीने वैद्यकीय सेवा देण्यात संघटनेचा वाटा आहे. हृदयरोगावरील चिकित्सा, अवघड प्रसूती व शस्त्रक्रिया आता येथे केल्या जात आहेत. येथे सर्व
विभागाचे नामवंत डॉक्टर उपलब्ध आहेत. त्याचा तालुक्यातील सर्वांना फायदा होत आहे. संघटनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, नैसर्गिक आपत्तीत वैद्यकीय सेवा, मधुमेह, रक्तगट तपासणी आदी शिबिरे घेतली आहेत.”
उपाध्यक्ष डॉ. काकडे म्हणाले, ” वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. येत्या वर्षात शिराळा मेडिकल संघटनेची सुसज्ज इमारत व रक्तपेढी सुरू करण्याचा मनोदय आहे. सामान्य माणसापर्यंत उत्कृष्ट वैद्यकीय सेवा, सुविधा पोचविण्याचा प्रयत्न राहील.