शिराळा मेडिकल असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड
शिराळा (प्रतिनिधी) :
शिराळा मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. सौ कृष्णा नितीन जाधव (स्त्रीरोग तज्ज्ञ एम.डी), उपाध्यक्ष डॉ. प्रदीप वसंत काकडे, सचिव डॉ.सौ. क्षमा प्रभाकर पाटील एम.बी.डीसीपी यांची निवड करण्यात आली.
असोसिएशनची सर्वसाधारण सभा पार पडली, या सभेमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. शिराळा मेडिकल असोसिएशनची स्थापना १९८२ साली करण्यात आली. पुढील वर्ष हे संघटनेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.
२४ वर्षामध्ये संघटनेने बरीचशी विधायक कामे केली आहेत. ग्रामीण व डोंगराळ भागामध्ये अत्यंत चांगल्या पध्दतीची वैद्यकीय सुविधा लोकांपर्यंत पोहचविण्याचा मोलाचा वाटा संघटनेने उचलला आहे. मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून ब्लड डोनेशन कॅम्प, नैसर्गिक आपत्तीवेळी योग्य ती वैद्यकीय सेवा पुरवणे, मधुमेह व रक्तदाब तपासणीचे मोफत शिबिर अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवले जातात. वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टर्सना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न होतो. आगामी वर्षामध्ये शिराळा मेडिकल असोसियशनच्या जागेवर एक सुसज्ज हॉल व ब्लड बैंक करण्याचा मानस आहे.