महिलांनी आरोग्यासाठी जागरूक रहावे : डॉ. स्मिता पाटील

महिलांनी आरोग्यासाठी जागरूक रहावे : डॉ. स्मिता पाटील

मांगले (वार्ताहर) : महिलांनी आरोग्याच्या बाबतीत जागरूक रहावे. संतुलित आहाराबाबत गांभीर्याने विचार करावा, असे प्रतिपादन ‘विश्वास’च्या संचालिका डॉ. स्मिता पाटील यांनी केले. फत्तेसिंगराव नाईक प्रबोधिनी व मांगल्य महिला संस्थेच्या वतीने आयोजित महिला आरोग्य शिबिर कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना डॉ.कृष्णा जाधव म्हणाल्या, आरोग्य ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे.
सुखी-संपन्न जीवनासाठी मानसिक, शारीरिक स्वास्थ्य गरजेचे आहे. त्यासाठी योग, व्यायाम, आहार याकडे स्त्रियांनी लक्ष द्यावे. याप्रसंगी महिला रुग्णांची आरोग्य तपासणी, औषधोपचार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *