महिलांनी इतिहासाकडे पाहावे : डॉ. कृष्णा जाधव
शिराळा, ता. ११ : महिलांनी देशाच्या इतिहासाकडे हिले पाहिजे, असे प्रतिपादन डॉ. सौ. कृष्णा जाधव यांनी केले. चिखली (ता. शिराळा) येथे आनंदराव नाईक महाविद्यालयात त्या बोलत होत्या. श्रीमती लीलावती फत्तेसिंगराव नाईक अध्यक्ष होत्या.
डॉ. सौ. जाधव म्हणाल्या, “जिजाबाई, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले आदींनी परिस्थितीवर मात करीत आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माणकेले. समाजापुढे आदर्श निर्माण केला. तो आदर्श सध्याच्या महिलांनी जोपासावा.” यावेळी प्राचार्य डॉ. एम. एल. होनगेकर यांनी मार्गदर्शन केले.
प्रा. नीता जोखे यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती आर. आर. देवकर यांनी पाहण्यांची ओळख सांगितली. व्ही. वाय. शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले. सौ. मनीषा नाईक, सौ. रंजना नाईक, सौ. मालन नाईक, सौ. वासंती देशमुख, तसेच प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.
जागतिक महिन दिन.