मेडिकल संघटनेचे शिराळ्यात स्नेहसंमेलन
शिराळा : येथील मेडिकल संघटनेचे स्नेहसंमेलन उत्साहात झाले. संघटनेच्या अध्यक्ष डॉ. सौ. कृष्णा जाधव, उपाध्यक्ष प्रदीप काकडे, सचिव सौ. क्षमा पाटील यांनी संयोजन केले. प्रारंभी डॉ. एस. वाय. कुरणे, डॉ. सुधीर देशपांडे, डॉ. ए. जी. कुलकर्णी, डॉ. एम. एन. मुल्ला यांनी दीपप्रज्वलन केले. अध्यक्ष डॉ. सौ. जाधव यांनी स्वागत केले. शरयू जाधव हिने स्वागतगीत म्हटले. डॉ. नितीन जाधव यांनी ओंकार स्वरूपा, निळे गगन निळी धरा, रात्रीत खेळ चाले ही गाणी सादर केली. डॉ. प्रभाकर पाटील यांनी ‘मनाच्या धुंदीत ये ना…’ हे गीत सादर केले.
हिने’किंदिलाची लग्नपत्रिका’ हा कार्यक्रम सादर केला. विराज काकडे, प्रतीक पाटील यांनी वक्तृत्व कला सादर केली. सोफिया मुल्ला, तनाज मुल्ला, ऋतुराज पाटील, तेजस्विनी जाधव यांनी नृत्यगीत सादर केली.
डॉ. प्रदीप काकडे यांनी ‘हिमोग्लोबिन’ ही कविता सादर केली. डॉ. प्रकाश पाटील यांनी ‘फनी गेम्स’चे संयोजन केले. या वेळी सौ. शैलजा काकडे, सौ. माया पाटील, डॉ. रहिम मुल्ला, डॉ. उमेश काकडे, डॉ. बी. बी. माने, डॉ. साईनाथ पाटील, डॉ. आबासाहेब पाटील, डॉ. अजय काळे, डॉ. सलिम मुल्ला, डॉ. सुषमा देशपांडे, सौ. वैशाली काकडे आदी उपस्थित होते.