शिराळा / प्रतिनिधी
शिराळा तालुका डोंगरी तालुका असून, विखुरलेला आहे. अशा परिस्थितीतही अडचणीच्या काळातही ज्येष्ठ डॉक्टरांचे काम उल्लेखनीय आहे. त्याचे योगदान फार मोठे आहे. विश्वास उद्योग समुहामार्फत अनेक सेवाभावी उपक्रम हातामध्ये घेऊन, समाजपयोगी काम चालू केले आहे. लोकांचा प्रतिसादही चांगला
मिळत आहे. डॉक्टरी व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञाने आली आहेत. नवीन टेकनॉलॉजीची माहिती ग्रामीण भागातील डॉक्टरांना मिळवण्यासाठी कै.फत्तेसिंगराव नाईक इन्डोमेट ट्रस्टच्यावतीने प्रयत्न करणार आहे. त्यांना मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी इन्टोमेन्ट ट्रस्टच्यामार्फत खर्च करणार असून, त्यासाठी कार्यशाळा सुरू करणार असल्याचे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी येथे केली.
आ. नाईक शिराळा येथील लायन्स क्लब शिराळा टाऊनच्यावतीने डॉक्टर्स डे निमित्ताने घेण्यात आलेल्या तालुक्यातील डॉक्टराच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रमोद नाईक होते. शिराळा येथील ज्येष्ठ डॉ. एम.एन.मुल्ला, डॉ.एस.वाय.कुरणे, डॉ.श्रीकांत सागावकर, डॉ.
साईनाथ पाटील प्रमुख उपस्थित होते.
नाईक म्हणाले, काही वेळेला डॉक्टर व पेशंट यांच्यामध्ये दुरावा निर्माण होतो.तो समन्वयाने मजावून घेवून पर्याय काढले पाहिजेत. दैनंदीन जीवनामध्ये डॉक्टराचे योगदान फार मोठे आहे.ठरावीक मंडळी गैरप्रकार करतात व ते सर्वांचे डोकेदुखी बनतात. त्यांना खड्यासारखे बाजूला काढले पाहिजे.
शिराळा येथील लायन्स क्लबच्या स्थापनेबरोबरच त्यांनी डॉक्टर्स डे च्या निमित्ताने डॉक्टरांच्या घेतलेला सत्कार हे काम म्हणजे आदर्श आहे. अशा उपक्रमामुळे लोकांमध्ये उत्साह निर्माण होतो. यावेळी प्रताप पाटील, धनश्याम आवटे, प्रमोद नाईक, अजयजाधव, डॉ. साईनाथ पाटील यांनी
मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास डी. जी. आत्तार, खलील मोमीन, महिंद्र गायकवाड, डॉ. वैशाली सागावकर,डॉ. प्रभाकर पाटील, डॉ. आबासाहेब
पाटील, डॉ.माया पाटील, डॉ. प्रभाकर पाटील उपस्थित होते.
तरुण भारत
३/२/२०१२