शिराळा / प्रतिनिधी
शिराळा तालुका डोंगरी तालुका असून विखुरलेला आहे.अशा परिस्थितीत अडचणीच्या काळातही ज्येष्ठ डॉक्टरांचे काम उल्लेखनिय आहे. विश्वास उद्योग समुहामार्फत अनेक सेवाभावी उपक्रम हातामध्ये पेवून समाजोपयोगी काम चालू केले आहे. लोकनेते के. फत्तेसिंगराव नाईक ईडोमेंट ट्रस्टच्या वतीने वैद्यकीय व्यवसायामध्ये नवीन तंत्रज्ञान आले आहे. नवीन टेक्नॉलॉजीची माहिती ग्रामीण भागातील वैद्यकीय व्यावसायिकांना मिळण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी इंडोमेंट ट्रस्टच्यामार्फत खर्च करणार असल्याचे प्रतिपावन आ. मामसिंगराव नाईक यांनी येथे केले आहे.
नाईक यांनी शिराळा येथील.लायन्स क्लब शिराळा टाऊनच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्ताने घेण्यात आलेल्या सत्कार समारंभातबोलत होते. अध्यक्षस्थानी लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रमोद नाईक होते. शिराळा येथील ज्येष्ठ डॉ. एम. एन. मुल्ला, डॉ.एस. बाय. कुरणे, डॉ. श्रीकांत सागावकर, डॉ. साईनाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती. आ. नाईक म्हणाले, काही वेळेला डॉक्टर व पेशंट यांच्यामध्ये दुरावा निर्माण होतो, तो समन्ययाने समजावन घेवन पर्याय कावले पाहिजेत. ठराविक मंडळी गैरप्रकार करतात व ते सर्वांचे डोकेदुखी बनतात.यांना खडपासारखे बाजूला काढले पाहिजे, असे प्रकार बंद झाले पाहिजेत.
शिराळा येथील लायन्स क्लबच्या स्थापनेबरोबर त्यांनी डॉक्टर्स डेच्या निमित्ताने डॉक्टरांचा करण्यात आलेला सरकार- आदर्शवत आहे. यावेळी लायन्स क्लबचे उपाध्यक्ष.प्रताप पाटील, घनःश्याम आवटे, प्रमोद नाईक, अजय जाधव, डॉ. साईनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास डी. जी. आतार,खलील मोमीन, महिंद्र गायकवाड, डॉ.वैशाली सागावकर, डॉ. प्रभाकर पाटील,डॉ. आबासाहेब पाटील, डॉ. माया पाटील, डॉ. प्रभाकर पाटील, विलीप घाडगे, डॉ. प्रदीप काकडे, डॉ. सलीम मुल्ला, रमेश कांबळे उपस्थित होते.