ग्रामीण डोंगरी विभागातील रुग्णांना चांगल्या पद्धतीने उपचार झाले पाहिजेत. डॉक्टरांनीही अल्पदरात रुग्णांना सेवा द्यावी, असे आवाहन आ.मानसिंगराव नाईक यांनी केले.
सिद्धिविनायक प्लाझामध्ये लायन्स क्लब ऑफ शिराळा टाऊनमार्फत ‘डॉक्टर्स डे’ निमित्त तालुक्यातील डॉक्टरांच्यासत्कारप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी क्लबचे अध्यक्ष प्रमोद ऊर्फ भाऊसाहेब नाईक होते. आ.नाईक म्हणाले की, वैद्यकीय क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान तसेच उपचार पद्धतीची
माहिती डॉक्टरांना मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंटल ट्रस्टमार्फत दरवर्षी बाहेरील डॉक्टरांसाठी एक दिवसाची कार्यशाळा
घेण्यात येईल. यावेळी डॉ. नितीन जाधव, डॉ. श्रीकांत सागावकर, डॉ.एस. वाय. कुरणे, डॉ. मुसा मुल्ला, डॉ.विक्रम इंगवले, सौ. कांचन इंगवले,
डॉ. कृष्णा जाधव, डॉ. बी. बी, माने, डॉ. प्रदीप काकडे उपस्थित होते.
लोकमत
६/७/२०१२