शिराळा (प्रतिनिधी) :
शिराळा तालुक्यातील दुर्गम भागात डॉक्टरांनी रूग्णसेवा चोख बजावली आहे. फत्तेसिंगराव नाईक इंडोमेंड ट्रस्टतर्फे त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,
अशी ग्वाही आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
शिराळा येथे लायन्स क्लब ऑफ शिराळा टाऊनतर्फे आयोजित ‘डॉक्टर डे’ कार्यक्रमात ते बोलत होते. शिराळा लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ.
प्रमोद नाईक प्रमुख उपस्थित होते. प्रारंभी डॉ. नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. प्रतापराव पाटील, राजीव पारेख, डॉ. एम.एन. मुल्ला डॉ. श्रीकांत
सागावकर, डॉ. नितीन जाधब,डॉ. एस. वाय: कुरेशी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
आमदार नाईक म्हणाले की, ते म्हणाले की, तालुक्यात फत्तेसिंगराव नाईक ट्रस्टच्या माध्यमातून शिराळा मेडिकल असोसिएशनतर्फे विविध आरोग्य
शिबिरे राबविण्यात यावीत. याचाफायदा ग्रामीण भागातील रुग्णांनाझाल्यास त्यांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळतील.
डॉ. नितीन जाधव म्हणाले, डॉक्टरी पैशात काही अपप्रवृत्ती आहेत. आमची संघटना अशा प्रवृत्तींना दूर ठेऊन सामाजिक जबाबदारी म्हणून काम करत
आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन अशा अपप्रवृत्तींना नष्ट करण्यासाठी काम केले पाहिजे. शिराळा तालुक्यात आमच्या संघटनेतील डॉक्टर
सामाजिक हेतूने प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यामुळे त्यांना सामाजतूनही आदराची वागणूक मिळत आहे. ही आम्हाला मिळालेली पोचपावती आहे, असा विश्वास डॉ. नाईक यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले की, तालुक्यात अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. दीपक यादव, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रभाकर पाटील, डॉ. सौ. कृष्णा नितीन जाधव, डॉ.श्रीकांत सागांवकर, बालरोगतज्ज्ञ डॉ. आबासाहेब पाटील, डॉ.विनायक महानवर, सर्जन डॉ.उमेश काकडे, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.कृष्णा नलवडे, पॅथॉलॉजिस्ट डॉ.सौ. सीमा पाटील, मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. प्रमोद काकडे, आथर्ववेदाचार्य वैद्य सलिम मुल्ला, भूलतज्ज्ञ डॉ. रहिम मुल्ला, आहारतज्ज्ञ डॉ. वैशाली सागांवकर, दंतवैद्य डॉ. शरद मिरजकर, डॉ. इंगवले आदींनी तालुक्यात उत्तम आरोग्य सेवा देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
प्रताप पाटील, अजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.. घनःशाम आवटे यांनी प्रास्ताविक केले. संदीप शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी दस्तगीर
अत्तार, सतीश जोशी, राजीव पाटील, दिनेश हसबनीस यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सुनील कवठेकर यांनी आभार मानले.