सामाजिक बांधिलकीतून आरोग्य शिबिर
संपतराव पवार यांचे प्रतिपादन
शिराळा, ता. २७ : सामाजिक बांधिलकीतून मोरणा-वारणा पतसंस्थेने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा उपक्रम राबविला, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष अॅड. संपतराव पवार यांनी केले.
येथील विश्वासराव विश्वासराव नाईक महाविद्यालयात संस्थेतर्फे मोफत आरोग्य शिबिरात ते बोलत होते. शिबिरात एकूण दोनशे रुग्णांची तपासणी झाली.
श्री. पवार म्हणाले, “संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त प्रचलित व्याजदरापेक्षा ठेवीवर जादा व्याज देण्यात येत आहे. त्यासाठी २२ मे ते ५ जून असा पंधरवडा निश्चित केला आहे. योजनेस चांगला प्रतिसाद आहे. सभासद, ठेवीदार यांच्यावर बोजा पडणार नाही, याची खबरदारी घेऊन संस्थेच्या फायद्यातून शिबिराचे संयोजन केले आहे. राज्यातीलbएक आदर्श संस्था म्हणून नाव मिळविण्याचा प्रयत्न आहे.”
डॉ. उमेश काकडे म्हणाले, “पंचवीस वर्षे संस्थेने चांगले काम केले आहे. विधायक उपक्रम राबविले जात आहेत.”
शिबिरात ६० जणांची रक्तगट तपासणी, ७५ जणांना मोफत चष्मेवाटप, ४८ जणांच्या लघवीतील साखरेची तपासणी करण्यात आली. डॉ. नितीन जाधव, डॉ. शरद मिरजकर, डॉ. सतीश पाटील, प्रमोद काकडे, डॉ. रणजित गायकवाड, डॉ. बाबासाहेब पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली. उपाध्यक्ष शिवाजीराव जाधव, संचालक सुरेश करूंगलेकर, चंद्रकांत चव्हाण, संजय घेवदे, जयसिंग कदम, मुंबई, वाशी व शिराळा शाखेचे व्यवस्थापक दिलीप पाटील, नारायण जगताप, सुदाम जाधव यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.