शिराळा मेडिकल असोसिएशनचे स्नेहसंमेलन उत्साहात
शिराळा येथील मेडिकल असोसिएशनचे स्नेहसंमेलन नुकतेच केमिस्ट भवन शिराळा येथे उत्साहात पार पडले. या स्नेह संमेलनाचे आयोजन आय. एम. ए. शिराळा चे अध्यक्ष डॉ. कृष्णा जाधव, उपाध्यक्ष डॉ प्रदीप काकडे व सचिव सौ. क्षमा पाटील यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. कुरणे, डॉ. डॉ. कुरणे, डॉ. देशपांडे, डॉ. कुलकर्णी, डॉ. एस. एन मुल्ला यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. डॉ. कृष्णा जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. स्वागत गीत शरयु जाधव हिने गायले. डॉ. नितिन जाधव यांनी ओंकार स्वरूपा, निले गगन निली धरा, प्रभाकर पाटील यांनी मनाच्या धुंदीत लहरीत येना रात्रीत खेळ चाले ही गाणी सादर केली. कु. सोनिका प्रदीप काकडे हिने कंदीलाची लग्न पत्रिका हा कार्यक्रम सादर केला. चि.विराज काकडे व प्रतिक पाटील यांनी वक्तृत्व कला सादर केली.
रुतुराज पाटील, तेजस्विनी जाधव यांनी नृत्य गीते सादर केली. डॉ. प्रकाश पाटील यांनी फनी गेम्स सादर केले. डॉ. प्रदीप काकडे यांनी ‘हिमोग्लोबीन’ ही कवीता सादर केली. या कार्यक्रमाला सौ. शैलेजा काकडे, डॉ. सौ. माया पाटील, डॉ. रहिम मुल्ला, डॉ. उमेश काकडे, डॉ. साईनाथ पाटील, डॉ. अरूण पाटील डॉ. आबासाहेब पाटील डॉ. सागावकर, डॉ. अजय काळे, डॉ. बी. बी. माने, डॉ. सलिम मुल्ला उपस्थित होते. आभार डॉ. काकडे यांनी मानले.
रविवार, २८ जानेवारी, २००७