शिराळा, ता. २३ : शिवाजीराव देशमुख शिक्षणशास्त्र महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालयांतर्गत ‘महाविद्यालयीन घटकांची गुणवत्ता वाढ’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेच्या सचिव रेणुकादेवी देशमुख यांच्या
हस्ते करण्यात आले. या वेळी प्रथम सत्रात प्रमुख पाहुणे अस्लम शिकलगार
दुसऱ्या सत्रात जयसिंग पाटील म्हणाले, “समाजाला आज हुशार माणसापेक्षा शहाण्या माणसाची गरज आहे. माणसांनी प्रत्येक वर्तमानाचा क्षण विधायक कामासाठी घालवावा. प्रत्येकगोष्ट सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करावी.” तिसऱ्या सत्रात डॉ कृष्णा जाधव म्हणाल्या, “समृद्ध जीवन जगण्यासाठी स्वतःबरोबर कुटुंबाचा व समाजाचा विचार करणे गरजेचे आहे.” प्रा. सुमन गायकवाड,
प्रा. व्ही. आर. पाटील, प्रवीण आंबोळे, वर्षा अस्वले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रेश्मा सावंत, जितेंद्र निंबाळकर, जोतिराम बने, शोभाताई जगताप तर प्रास्ताविक डॉ. व्ही. आर. पाटील, नीताताई कांबळे, अपर्णा काळे, सारिका निकम यांनी केले.राजेंद्र गावडे, प्रियांका पाटील, संध्याराणी मगदूम, बाळासाहेब नाईक यांनी आभार मानले.