शिराळा, दि. १३ (वार्ताहर) :
विश्वासराव नाईक प्राध्यापक व येथील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आगळा-वेगळा उपक्रम राबविला. शिराळ्यातील सर्वस्तरातील यशस्वी रागिणींचा त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन सन्मानचिन्ह, शुभेच्छापत्र देऊन गौरव करण्यात आला. यशस्वी महिलांमध्ये प्राचार्या उज्वला पाटील, शोभाताई नाईक, ‘निनाईदेवी’ शिक्षणच्या कार्याध्यक्षा रेणुका देशमुख, शारदादेवी नाईक, पं.स. सदस्या वैशाली नाईक, तहसीलदार मौसमी बर्डे, डॉ. कृष्णा जाधव, अॅड. नेहा सूर्यवंशी, शालन आलेकर तसेच ग्रामीण रुग्णालय, शिराळा पंचायत समिती, पोलीस ठाणे, एस. टी. आगार या कार्यालयातील महिला कर्मचारी वर्ग, शेतकरी महिला, ग्रामपंचायतीतील महिला, स्वच्छता कामगार, महिला बचत गट, महिला भाजी विक्रेत्या यांचा सन्मान करण्यात आला.
या उपक्रमाचे संयोजन प्रा. सम्राट शिंदे, प्रा. आर. एस. कदम, प्रा. संजय झुंबाडे, विद्यापीठ प्रतिनिधी अविनाश कदम, रणजित आलेकर, विजय
थोरबोले, गणेश शिंदे, गायकवाड, संदीप कांबळे, प्रशांत कांबळे आदी विद्यार्थ्यांनी केले. शिराळ्यातील सर्वस्तरातील यशस्वी महिलांचा सत्काराच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.