स्वाती जाधव
Feb 6, 2024
नमस्कार
मी स्वाती जाधव रा. कापरी दि :- 06/02/2024 रोजी मी या दवाखान्यात आले. माझ्या मिस्टरची तब्येत
खराब होती त्यांना गेले ६ महिने खोकला आहे. त्यामुळे आम्हाला आनंद हॉस्पीटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला. आम्ही येथे आलो डॉक्टर नितिन जाधव (सर) यांनी माझ्या मिस्टरनवर उपचार करून त्यांची प्रकृतीत चांगली सुधारना होत
आहे येथील डॉक्टर व स्टॉफचे मी आभार मानतो.
स्वाती जाधव
रा. कापरी
श्रीराम चंद्रकांत फाळके
Jan 24, 2024
अभिप्राय
मी श्रीराम चंद्रकांत फाळके, रा. भेडसगांव ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर, आपल्या आनंद हॉस्पीटल बद्दल मी यापूर्वी खूप ऐकले होते. अतिशय चांगले हॉस्पीटल सर्व सोयी उपलब्ध, अनुभवी डॉक्टर, तज्ज्ञ डॉक्टर हॉस्पीटलमधील सर्व स्टाफ अतिशय चांगला प्रेमळ पेशंटची काळजी घेणारा 24x7
मी 2023 पासून याच हॉस्पीटल मध्ये ट्रीटमेंट घेत आहे, जे काही मी या दवाखान्याबद्दल व येथील सर्व सोयी व स्टाफ बद्दल जे ऐकले होते ते प्रत्यक्षात अनुभवले आहे. येथील डॉक्टरांचे उत्तम उपचार पद्धती व योग्य ते मार्गदर्शन यामूळे मी तरी खूप समाधानी आहे. नक्कीच या हॉस्पीटल बद्दलचा रेफरन्स भी अनेकांना देईन धन्यवाद.
आपका विश्वासू
श्रीराम चंद्रकांत फाळके
राजु रघुनाथ कुंभार
Jan 18, 2024
मी राजु रघुनाथ कुंभार हातकणंगले जि कोल्हापूर माझी आईची तब्येत अचानक बिघडली आई भावा कडे गावी असल्याने त्यांचा फोन आला काय करावे काही सुचेना अशा वेळी मी भावाला सांगितलं कि मिळेल ती गाडी ठरवून शिराळ्याला ये. आमचे फॅमिली डॉ नितीन जाधव सर यांच्या कडे आल्यानंतर त्यांनी चांगल्या प्रकारे पेशंटवर उपचार सुरु केले व पेशंट बारा झाला. डॉक्टरांनी चांगले मार्गदर्शन केले येथिल सर्व स्टाफ देखील अगदी चांगल्या प्रकारे पेशंटची काळजी घेतात स्वच्छता ही छान आहे. मी आनंद हॉस्पिटल चा व सर्व स्टाफचा शत:शा आभार मानतो धन्यवाद!
मानसिंग महादेव पाटील
Jan 15, 2024
नमस्कार सर, मी मानसिंग महादेव पाटील रा. खिरवडे ता. शिराळा जि. सांगली येथे राहणारा माझे वडील महादेव गणपत पाटील हे दिनांक ९-१-२०२४ ला त्यांना अचानक उजवी बाजू बंद पडली व काम करणे बंद झाले व त्यांची अचानक तब्येत बिघडली त्यामुळे आमच्या आजू बाजूला राहणारे सर्व शेजारी गोळा झाले व माझ्या वडीलांची परिस्थिती पाहून सर्वजण अनेक प्रकारचे सल्ले देऊ लागले कोण सांगे कोल्हापूर /कराड /इस्लामपूर/सांगली या ठिकाणी घेऊन जावू असे सांगू लागले.
माझी आई तिथे एकटी असल्याने तिला काय करावे हे समजेना त्यामुळे तिने मला मुंबई ला फोन केला व वडिलांची परिस्थिती सांगितली पण माझ्या डोक्यायत विचार आला कि मी डॉ नितीन जाधव सर त्यांच्या बद्दल मला बाहेरून माहिती होती व माझे एक नातेवाईक सरांकडे उपचार घेत होते व त्यांना सरांनी चांगल्या प्रकारे बरे केले होते त्यामुळे क्षणाचा विचार न करता मी माझ्या आई व परिवारातील लोकांना सांगितले कि तातडीने डॉ नितीन जाधव सरांकडे घेऊन जावे.
जेव्हा माझे वडील डॉ. नितीन सर यांचा कडे आले तेव्हा त्यांनी काय प्रॉब्लेम आहे हे लगेच ओळखले व त्यांना उपचार सुरु केला व वडिलांची तब्येत स्थिरावली व त्यांना आराम मिळाला. मी गेले ५ दिवस हॉस्पिटल ला आहे, तर हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ/डॉक्टर /नर्स महत्वाचे म्हणजे साफसफाई करणारे कामगार हे दोन वेळा येउन साफसफाई करतात. हे मला फार आवडले व सर रुग्णांना पाहून लगेच काय करावे व काय न करावे सांगतात हे मला चांगले आवडले. त्यामुळे उपचार करणार्यांना चांगला उपयोग होतो त्या बद्दल मी सरांचे आभार मानतो सर तुमची सेवा अशीच चालत रहावी ही श्री चरणी प्रार्थना व आपला जो कामगार वर्ग आहे तो चांगल्या प्रकारे प्रतिसाथ देतो हे पाहून चांगले वाटले.
रितेश आवटे
Jan 15, 2024
मी रितेश आवटे, रा. शिराळा ४ दिवस पूर्वी माझी आई इंदुमती अशोक आवटे हिच्या पांढऱ्या पेशी वाढल्या मुळे आपल्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. डॉ. जाधव सर यांचाकडे यापूर्वी आम्ही वेगवेगळ्या कारणास्तव आलो आहोत. येथे आल्यावर डॉ. जाधव यांनी पेशंट बद्दल सर्व माहिती विचारून मगच ट्रीटमेंट चालू केली ते पेशंटला धीर देतात व तुम्हाला काही झाले नाही यातच पेशंटचा निम्मा आजार पूर्ण बरा होतो. व येथील स्टाफ ही पेशंटची विचारपूस करून त्यांना वेळच्यावेळी औषध देतात, व येथील स्वच्छता ही दिवसातून दोन वेळा केली जाते व येथील स्टाफ नर्स मेडिकल स्टाफ ही मनमिळावू आहे. आणि येथील वातावरण ही शांत आहे.
रामचंद्र मोहन गुरव
Jan 15, 2024
मी रामचंद्र मोहन गुरव आमचे नातेवाईक नथुराम नायकवडी यांना लिव्हर आजाराशी संबंधित कारणाने आनंद हॉस्पिटल मध्ये आलो असता आलेला अनुभव असा-
गेले ६ ७ दिवस मा डॉक्टर यांनी रोजच आम्हाला होणारे उपचार पेशंट ची स्थिती या विषयी पूर्ण माहिती देवून आमच्या शंकेचे निरसण केले डॉक्टर सहित सर्व स्टाफ ने मनमिळावू वृत्तीने आमच्या पेशंटची काळजी घेतली यासाठी हॉस्पिटल चे धन्यवाद!