अभिप्राय

तेजेंद्र राजीव पाटील

Jan 11, 2024

नमस्कार दि. 11/01/2024 मी तेजेंद्र राजीव पाटील माजी आजी श्रीमती लक्ष्मीबाई बाबुराव पाटील ही आनंद हॉस्पीटल शिराळा डॉ. नितीन सर याची पेशंट आहे. जाधव सर हे अमच्या फॅमिलेसाखरे आम्हास उत्तम सेवा देतात. त्याचे निदान अचूक असते. त्याचा स्टॉप उत्तम सेवा देतो. हा दवाखाना उत्तम आहे धन्यवाद नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

विजय दळवी

Jan 10, 2024

मी विजय दळवी रा.शिराळा काल संध्याकाळी माझी मुलगी कु. सरगम विजय दळवी हिचा BP कमी झाल्यामुळे डॉ. जाधव मॅडम यांच्या आनंद हॉस्पिटलमध्ये या पूर्वीही वेगवेगळ्या कारणास्तव आलो आहोत. नावा प्रमाणेच इथे आनंदी वातावरण असते. १२ तासातच हिची तब्येत सुधारत असल्याचे जाणवू लागले. इथला स्टाफ मितभाषी,मनमिळावू असल्याने घरच्या वातावरणात असल्याचे जाणवते. हॉस्पिटल मध्ये शांतता व स्वच्छता असल्याने मन प्रसन्न राहते. खरंतर अभिप्रायात लिहिण्यासारखे खूप आहे, आम्ही पूर्ण विश्वास ठेवून या हॉस्पिटल मध्ये येतो हाच आमचा अभिप्राय आहे. इथे आलं कि ५० टक्के आजार आधीच बरे होतात. निश्चिन्त राहून इलाज घेऊन आम्ही आनंदात घरी जातो. इथे सर मॅडम स्पष्ट बोलतात कोणतीही गोष्ट लपवली जात नाही. त्यांचे पुरोगामी वागणे हे मनाला भावणारे आहे. सामाजिक कार्यात त्यांनी नेहमीच आघाडी घेतली आहे त्यांचे छोटे खाणी वस्तू संग्रालय स्थापन केले असून त्यांतील आश्चर्यकारक वस्तू पाहून मन आनंदित होते. हॉस्पिटलचे उत्तम नियोजन केले असावे हे आनंद हॉस्पिटल मध्ये आल्यावर समजते इथल्या सर्व स्टाफ, मेडिकल स्टाफ, जाधव सर, मॅडम या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! व भावी वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद!

शैला प्रकाश कांबळे

Jan 10, 2024

नमस्कार, मी शैला प्रकाश कांबळे मी आनंद हॉस्पिटल शिराळा डॉ नितीन जाधव सर यांची पेशंट आहे. जाधव सर आमच्या फॅमिली सारखे आम्हास उत्तम सेवा देतात त्यांचे निदान अचूक असते योग्य उपचार व मार्गदर्शन मुळे आम्हाला आमचे आरोग्य चांगले राहावे यासाठी चांगला सल्ला देतात. त्यांच्या मुळे आमच्या कुटुंबातील लोक व नातेवाईक सुद्धा त्यांच्या शिवाय दुसरीकडे कुठे जात नाहीत त्यांचा स्टाफ ही चांगला तत्पर व उत्साही असतो. ते सुद्धा चांगल्या प्रकारे रुग्णांची विचारपूस करतात, सेवा करतात धन्यवाद!

शैला प्रकाश कांबळे

Jan 10, 2024

नमस्कार १०/०१/२०२४ मी शैला प्रकाश कांबळे, मी आनंद हॉस्पिटल शिराळा डॉ नितीन जाधव सर यांची पेशंट आहे जाधव सर आमच्या फॅमिलीसारखे - आम्हास उत्तम सेवा देतात. त्यांचे निदान अचूक असून योग्य उपचार व मार्गदर्शनामुळे आम्हाला आमचे आरोग्य चांगले राहावे यासाठी चांगला सल्ला देतात त्याच्या मुळे आमच्या कुटुंबातील लोक व नातेवाईक सुधा त्यांच्याशिवाय दुसरीकडे जात नाहीत. त्यांचा स्टाफहि चांगला तत्पर व उत्साही असतो.. ते सुद्धा चांगल्या प्रकारे रुग्णांची विचारपूर करतात सेवा करतात. - धन्यवाद नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

वर्षा राहुल सावंत

Jan 8, 2024

नमस्कार, मी अभिप्राय देणार सौ.वर्षा राहुल सावंत.माझे संसार शिरोली (पु) ता. हातकणंगले जि. कोल्हापूर, मी उपचार साठी म्हणजेच प्रसूतीसाठी माहेर कापरी ता. शिराळा जि.सांगली येथे आले होते. तेव्हा मी आनंद हॉस्पिटल मध्ये डॉ.कृष्णा जाधव यांच्या बद्दल ऐकल्याने मी इथे प्रसूतीसाठी नाव नोंदविले. कारण माझे पप्पा डॉ. नितीन जाधव सर यांच्याकडे उपचार घेत आहेत. त्यामुळे आमचे संबंध घरातल्यान सारखे आहेत. सर मॅडम खूप छान स्वभावाचे आहेत मला जास्त काही लिहिता येणार नाही, कारण असं अचानक लिहिता येत नाही. पण इथला स्टाफ खूप छान आहे. माझी काळजी घेतली, माझ्या प्रसूती नंतर माझ्या बाळाची काळजी घेतली. मला जुळे झाले म्हणून मी बाळांची काळजी घेतली असे म्हणाले. मी हॉस्पिटल मध्ये राहायला नको म्हणत असते कारण, अस्वच्छता असते पण इथे मला घरात राहिल्या सारखं वाटलं. लिहायला तर खूप आहे पण बस करते पण एवढंच म्हणेल कि सर व मॅडम यांनी खूप चांगली विचारपूस करत काय होतंय का काही त्रास होतोय का मला तरी खूप मस्त वाटले माझे हे सहा दिवस मला जमेल तसे मी लिहिले धन्यवाद सर-मॅडम !

शामराव महादेव पाटील

Jan 4, 2024

नमस्कार श्री शामराव महादेव पाटील मि माझा भाऊ युवराज आनंदा पाटील याला ( तुरुख वाडी,ता. शाहुवाडी जि. कोल्हापूर)श्री.डॉ.नितीन जाधव यांच्या बदल माहिती मिळाली आणि मि. त्याला घेऊन आनंद हॉस्पीटल आलो.त्यांचे पेशंटला सुंदर प्रकारे समजावून सांगणे शांतपणे समजावणे त्यांचा स्वभाव व हसमुख चेहरा मला फार सुंदर वाटलं डॉक्टर हा दुसरा परमेश्वर असतो त्यांच्यात मला खरोखर दुसरा परमेश्वर दिसून आला पाच हॉस्पिटल मधून मी माझ्या भावाला इथे घेऊन आलो पण इथे त्याला चांगला गुण जाणवला पेशंटची व्यवस्थित काळजी व त्यांना समजावणे हि त्यांची पद्धत मला मनापासून आवडली. 4-1-2024