गंगधर मॅडम
Jul 3, 2023
नमस्कार, मी अभिप्राय देणार सौ. गंगधर मॅडम जि. प. शाळा ढणापुडे ता. वाळवा जि. सांगली चार दिवसापूर्वी मी दवाखान्यात ऍडमिट झाले. त्या वेळी माझी अवस्था ठीक नव्हती, पण डॉ. नितीन जाधव व डॉ. कृष्णा जाधव यांच्या स्मित हास्य व आपुलकीपणा यामुळे माझा आजार ५० टक्के कमी झाला त्यांच्या स्टाफ मधील सर्वजण प्रामाणिक व मनमिळावू आहेत मी हॉस्पिटल मध्ये आहे असे मला वाटले नाही तर आपल्याच घरात आहे असे वाटले मी लगेच बरी झाले त्यांचे औषध उपचार फार खर्चिक नाहीत सर्व सामान्य लोकांना परवडेल असेच आहेत त्यामुळे गर्दी ही असतेच धन्यवाद!
वैभव मारुती धस
Jun 4, 2023
जय श्री राम,
दि. ४/६/२०२३.
नमस्कार,
मी अभिप्राय देणार श्री वैभव मारुती धस,रा. बिळाशी, येथील रहिवाशी आहे. माझी आई श्रीमती छाया मारुती यस हीस हार्ट अटॅक आल्याने दाखल झालो. आनंद हॉस्पीटल शिराळा, येथील डॉ. नितीन सरांनी आईवर उपचार सुरु केले व एक क्षणात तीचे प्राण वाचवले. अनंत रूपाने भेटन
डॉ. नितीन आधव आमच्यासाठी माणसातील देवच आहेत, त्यांचे ऋण फेडणे केवळ अशक्य आहे. या क्षेत्रात डॉक्टरांचा खुप मोठा अनुभव आहे. शिराळा पंचक्रोशी व सांगली, कोल्हापूर सात अशा अनेक जिल्ह्यातून पेशंट मोठ्या विश्वासाने उथे येतात आणि बरे होवून परत आतात.
असतो.
या आधही माझ्या आईला आम्ही इथे अॅडमिट केले होते. वर्षापूर्वी म्हणजे २०-२२ माझ्या वडिलांनाही इथेच उपचार घेतले होते. व सर्व वेळी आम्हाला खुप चांगला अनुभव आला आहे. ट्रिटमेंट काळजीने व तत्परतेने देतात. लक्ष घालून दिवसातून ते सर्व वारेवार भेट देतात व पेशंटच्या वेदना व आजार बरा करण्यावर भर देतान सर्वोत्तम इलाज व माफक मोबदला (बिल) ही त्यांची खाशियत आहे. ते परिस्थिती जाणून प्रसंगी बिल कमीही करतात. आपल्या परिसरात म्हणूनच त्यांचा मोठा नावलौकीक आहे. ते सांगली जिल्हयाचे भूषण आहेत. नातेवाईकांना समजावून सांगण्याची पद्धत फार प्रभावी आसून त्यात कमालीची पारदर्शकता, सकारात्मकता व विश्वासार्हता असते.
हॉस्पीटलमधील सर्व स्टाफ खुप मनापासून सेवा देतात. त्यांच्यामध्येही खूष समजूतदारपणा यांची कर्तव्यदक्षता वाखाणण्याजोगी आहे. विशेषकरून उमेश सर, माधवी सिस्टर यांचा सेवाभाव व कार्यतत्परता प्रभावित करणारी आहे.
सर्व स्टाफ डॉक्टरांनी योग्य ट्रेनिंग देवून तयार केला आहे व त्याच्या स्वभावाची छवी सर्व स्टाप मध्येही उतरलेली अढळते.डॉक्टर व मॅडम सो. कृष्णा जाधव याचे बारिक लक्ष पेशेट्च्या ईम्प्रूव्हमेंटवर असते.त्यांच्या कामावर फोकसउ असलेले आढळून येते. याबद्दल त्यांची निष्ठा प्रामाणिकपणा व स्कोल माझ्यासारख्या छोट्या मानसाने बोलने म्हणजे सुर्याबद्दल काजल्याने सांगण्याप्रमाणे आहे. आयुआरोग्य देवगे व त्याच्या हातून समाजहिताचे कार्य अखंडपणे
रुग्णसेवेचे, राहो हीच मनस्वी प्रार्थना करतो, त्यांच्या कार्याला सदिच्छा अर्पण करतो. त्याचे व त्यांच्या सर्व स्टाफचे आभार व सर्वांना त्याच्या सत्कार्यास
चिंततो व अनेक अनेक सुभेच्छा देतो.
जय हींद, जय भारत.
मी माझी एक कविता डॉक्टरांच्या कार्याला समर्पित वैभव घस. बिळाशी मी अनेक सामाजिक अध्यात्मीक कविता लिहील्या आहेत त्यापैकीच माझी ही एक कविता यात जिथे जिथे मी कविता असे म्हंतले आहे. तिथे तुम्ही डॉक्टर जाधव सर असे वाचा. म्हणजे सोपे जाईल कवितेचं शर्षिक आहे -
जाईल-नगाड
" कवितेने वेचले नसते तर ........
कवितेने वेचले नसते तर सारे विस्कटून गेले असते आयुष्य,
कवितेने शिवले म्हणून फार बरे झाले,
नाहीतर असेच फाइन गेले असते आयुष्य."
आज माणसाला माणूस ओळखत नाही अशा टप्प्यावर येऊन पोहचलो आहोत आपण. कविता अजून हि मनाला जपते आहे, धडपडणाऱ्या माणसाकडे आपलेपणाने बघते आहे, मी हात न जोडता हि दिले आशीर्वाद कवितेने, नाहीतर असे कोणी जवळ केले असते ममतेने. खरंच कवितेने शिवले म्हणून फार बरे झाले नाही तर असेच फाटून गेले असते आयुष्य.
अहो संकटांचे सोडून द्या, त्यांची रोजचीच असते खिरापत. पण भीती असते तरी कितपत? घामेजलेल्या माणसासाठी कवितेचा आजही मोकळा आहे पदर, आणि तिच्याशिवाय आपली अशी कोण करतो कदर.
खरंच कवितेने शिवले म्हणून फार बरे झाले, नाहीतर अशेच फाटून गेले असते आयुष्य. कवितेने वेचले नसते तर सारे विषयातून गेले असते आयुष्य.
धन्यवाद!
वसंत रावजी लोहार
May 27, 2023
नमस्कार, मी वसंत रावजी लोहार,
रा. राकुर्डे बु ता. शिराळा, जि. सांगली.
मी माझ्या मनापासून श्री आनंद हॉस्पिटल शिराळा यांना अभिप्राय देतो कि, डॉ. श्री. नितीन जाधव यांची सेवा चांगलीच असते व निस्वार्थी असते पेशंटची लुबाडणूक होत नाही. योग्य फी आकारली जाते आजार छोटा व बिल मोठे असे कधीही केले नाही.
आम्ही ४० वर्षे पासून इथे पेशंट म्हणून येतो पण कसलीही फसवणूक नाही. त्यांची सेवा सामान्यांना अतिशय प्रामाणिक आहे व कमीच दराची आहे तसेच दवाखान्यात शांतता, सेवा, रिझल्ट, आपुलकी, दैवीभाव , माणुसकी जाणून आली डॉक्टर, सिस्टर, इतर स्टाफ सुद्धा सेवा चांगल्या देतात व सर्वांचे आभार मानतो.
उत्तम दगडू माने
May 27, 2023
नमस्कार,
मी उत्तम दगडू माने ता. शिराळा, जि. सांगली मी माझ्या मनापासून माझा अभिप्राय देतो कि, डॉ. श्री. नितीन जाधव यांची सेवा चांगलीच असते व निस्वार्थी असते पेशंटची लुबाडणूक होत नाही. योग्य फी आकारली जाते आजार छोटा व बिल मोठे असे अज्जीबात केले जात नाही.
आम्ही खूप दिवसं पासून इथे पेशंट म्हणून येतो पण आतापर्यंत असे अजिबात आम्हाला आढळून आलेले नाही. त्यांची सेवा सामान्यांना अतिशय प्रामाणिक आहे व तसेच दवाखान्यात शांतता, सेवा, रिझल्ट, आपुलकी, दैवीभाव, माणुसकी जाणून आली डॉक्टर, सिस्टर सुद्धा सेवा चांगल्या देतात व सर्वांचे आभार मानतो.
हरिश्चंद्र वसंत ठाकर
May 26, 2023
श्री. स्वामी समर्थ
नमस्कार,मी. खालीलप्रमाणे सही करणार श्री. हरिश्चंद्र वसंत ठाकर रा. कांदे ता.शिराळा जि. सांगली अभीप्राय लिहून देतो की,
दि. २२-५-२०२३ रोजी मला धापेचा तास माझ्या लिव्हरला सुज आली त्यामुळे मी.श्री डॉ नितीन जाधव व सौ-डॉ. कृष्णा जाधव यांच्या शिराळा येथील (आनंद हॉस्पीटल) मांगले रोड या ठिकाणी आलो असता. डॉ. जाधव यांनी माझी प्राथमिक आरोग्य तपासणी केली व ऍडमिट करून घेतले. डॉ. जाधव व त्यांच्या पत्नी यांनी माझ्यावर चांगले प्रकारे उपचार केले. व माला शुक्रवार दि.२६-५-२०२३ पर्यंत व्यवस्थित केले. व त्यांची उपचार पद्धत चांगली आहे. तसेच सदर दवाखान्यामधील महिला व पुरुष १५ कर्मचारी यांनी अतिशय उत्तम प्रकारे सेवा करून सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केले. तसेच दवाखाना भरपूर मोठा असून सदर दवाखान्यामध्ये सर्व सोयी व सुविधा आहेत त्याबदल दवाखान्याचे ऋणी मी आहे.सहकार्य केले,तसेच दवाखाना भरपूर मोठा असून सदर दवाखान्यामध्ये सर्व सोयी व सुविधा आहेत.धन्यवाद!
कळावे.
आपला विश्वासू
श्री. हरिश्चंद्र वसंत ठाकर
सुषमा कृष्णा उगळे
Apr 29, 2023
नमस्कार,
मी सुषमा कृष्णा उगळे, रा.- ता.चिखली जि. सांगली, दि. 29-04-2023 रोजी माझी प्रसूती आनंद हॉस्पीटल, शिराळा येथे मला मुलगा झाला. दि. 29-03-2023 रोजी सर्वप्रथम डॉ. सौ. कृष्णा जाधव मॅडम यांच्याकडे मी मुंबईवरून उपचारकामी आले. जाधव मॅडम यांनी खूपच चांगल्या प्रकारे समुपदेशन करून चांगले ट्रीट केले. गर्भावस्थेतील ज्या काही मला समस्या होत्या त्यांचे अतिशय सोप्या पद्धतीने विश्लेषण करून बाबी समजावून सांगितल्या, तसेच डॉ.जाधव सर यांनीही वेळोवेळी मार्गदर्शन केले.
दि. 29.04-23 ते 05-04-23 रोजी दरम्यान आनंद हॉस्पीटल येथे प्रसूतीकरिता ऍडमिट असतानाही हॉस्पीटलमधील सर्व नर्स स्टाफ ( महिला-पुरुष) यांनीही खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केले. काळजी घेतली. तसेच हॉस्पीटल मधील स्वच्छता ही वाखाणण्याजोगी आहे. माझ्या माहीतीतील इतर कोणी नातेवाईक यांनाही मी या हॉस्पीटलबाबत नक्की रेफर करेन.
धन्यवाद,