सुषमा कृष्णा उगळे
Apr 29, 2023
नमस्कार,
मी सुषमा कृष्णा उगळे, रा.- ता.चिखली जि. सांगली, दि. 29-04-2023 रोजी माझी प्रसूती आनंद हॉस्पीटल, शिराळा येथे मला मुलगा झाला. दि. 29-03-2023 रोजी सर्वप्रथम डॉ. सौ. कृष्णा जाधव मॅडम यांच्याकडे मी मुंबईवरून उपचारकामी आले. जाधव मॅडम यांनी खूपच चांगल्या प्रकारे समुपदेशन करून चांगले ट्रीट केले. गर्भावस्थेतील ज्या काही मला समस्या होत्या त्यांचे अतिशय सोप्या पद्धतीने विश्लेषण करून बाबी समजावून सांगितल्या, तसेच डॉ.जाधव सर यांनीही वेळोवेळी मार्गदर्शन केले.
दि. 29.04-23 ते 05-04-23 रोजी दरम्यान आनंद हॉस्पीटल येथे प्रसूतीकरिता ऍडमिट असतानाही हॉस्पीटलमधील सर्व नर्स स्टाफ ( महिला-पुरुष) यांनीही खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केले. काळजी घेतली. तसेच हॉस्पीटल मधील स्वच्छता ही वाखाणण्याजोगी आहे. माझ्या माहीतीतील इतर कोणी नातेवाईक यांनाही मी या हॉस्पीटलबाबत नक्की रेफर करेन.
धन्यवाद,
सोनाली पाटील
Feb 6, 2006
नमस्कार,
मी सोनाली पाटील रा. बिळाशी दि:- 06/०२/२००७ रोजी माझ्या आईची तब्येत बिघडली होती, म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले नितीन जाधव (सर) आनंद हॉस्पीटल येथे तिला घेऊन आलो. त्यावेळी आमच्या आईची परिस्थिती क्रिटिकल होती पण आनंद हॉस्पीटल मध्ये सरांच्या प्रयत्नामुळे तसेच आनंद हॉस्पीटल मध्ये कार्यरत असलेल्या स्टाफमुळे आमच्या मनातील भितीचे वातावरण कमी झाले तसेच सध्या पाहता तिची परिस्थिती मध्ये सुधारणा
होत आहे. त्यामुळे आनंद हॉस्पीटल मधील डॉक्टर व सर्व स्टाफचे आभार मानतो.
(सोनाली पाटील)
रा. बिळाशी